Asia Cup 2022 India Vs Pakistan Virat Kohli Shaheen Afridi esakal
क्रीडा

Video | Asia Cup 2022 : किंग कोहलीने केली दुखापतग्रस्त शाहीनची विचारपूस

अनिरुद्ध संकपाळ

Asia Cup India Vs Pakistan Virat Kohli Shaheen Afridi : आशिया कप 2022 ची सुरूवात 27 ऑगस्टपासून होत आहे. मात्र सर्वांचे लक्ष 28 ऑगस्टला होणाऱ्या भारत पाकिस्तान सामन्यावर असणार आहे. दरम्यान, या हाय व्होल्टेज सामन्यासाठी दोन्ही देशांचे खेळाडू दुबईत दाखल झाले आहे. गेल्या वर्षी टी 20 वर्ल्डकपनंतर भारत पाकिस्तान पहिल्यांदाच आमने सामने येत आहेत. दरम्यान, सरावासाठी जात असताना भारतीय संघ आणि पाकिस्तानी संघातील खेळाडू एकमेकांसमोर आले. पाकिस्तानचा स्टार वेगवान गोलंदाज शाहीशाह आफ्रिदी आणि विराट कोहली यांची देखील भेट झाली. यावेळी विराट कोहलीने दुखापतग्रस्त शाहीन आफ्रिदीची चौकशी केली.

पाकिस्तान क्रिकेट टीमने आपल्या अधिकृत यूट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. सरावादरम्यान, भारत आणि पाकिस्तानचे खेळाडू एकमेकांच्या समोर आले. त्यावेळी भारतीय संघातील खेळाडूंनी पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीची आपुलकीने विचापूस केली. यात युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आणि विराट कोहलीचा समावेश होता. शाहीन आफ्रिदीने देखील या दोघांशी हस्तांदोलन करत आपल्या दुखापतीबद्दल माहिती दिली.

पाकिस्तानने गेल्या टी 20 वर्ल्डकपमध्ये भारताचा 10 विकेट्स राखून पराभव केला होता. वर्ल्डकप इतिहासातील भारताचा हा पाकिस्तानकडून झालेला पहिला पराभव होता. मात्र या सामन्यात अजून एक विशेष गोष्ट घडली होती. भारताने जरी सामना गमावला असला तरी खिलाडूवृत्तीचे उत्तम उदाहरण समोर ठेवले होते. तत्कालीन संघाचा कर्णधार विराट कोहलीने बाबर आझम आणि मोहम्मद रिझवानला मिठी मारली होती. भारत पाकिस्तान सामन्यातील हे एक वेगळे आणि खास चित्र होते. त्याचाच पुढचा अंक विराट आणि शाहीन आफ्रिदीच्या रूपात आशिया कपच्या सरावावेळी दिसला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: शेअर बाजारात मोठी उसळी! सेन्सेक्स 1,100 अंकांनी वाढला, निफ्टी 23,900 पार; सेन्सेक्स-निफ्टीत अचानक वाढ का?

शांतता कराराची घोषणा पण ट्रम्पसमोर इराणच्या ३ मोठ्या अटी, अमेरिका-इराण डीलमध्ये १४ मुद्दे महत्त्वाचे

Fifa World Cup 2026: ब्राझीलला बरोबरीचेच समाधान; मोरोक्कोसमोर पाच वेळच्या विजेत्यांचा कस, व्हिनिसियसच्या गोलने दिलासा

Pune Solapur Highway Traffic : पुणे-सोलापूर महामार्गावर अभूतपूर्व वाहतूक कोंडी, वाहनांच्या ६ किलोमीटरपर्यंत रांगा; प्रवाशांचे प्रचंड हाल

Latest Marathi News Live Update : पुण्यात आजपासून पाणी कपात

SCROLL FOR NEXT