Asia Cup 2023 Controversy  esakal
क्रीडा

Asia Cup 2023 Controversy : टीम इंडियाच्या जर्सीवर पाकिस्तानचं नाव.. वादांच्या मालिकेत अजून एका वादाची भर?

अनिरुद्ध संकपाळ

Asia Cup 2023 Controversy : आशिया कप 30 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. यंदाच्या आशिया कपचे आयोजक पाकिस्तान असलं तरी भारताने पाकिस्तानात खेळण्यास नकार दिल्याने भारताचे सर्व सामने श्रीलंकेत होणार आहेत. पाकिस्तानने हायब्रीड मॉडेल अवलंबले असून आशिया कपचे काही सामने पाकिस्तानमध्ये तर बाकीचे सामने श्रीलंकेत आयोजित केले जाणार आहेत. (Team India Jersey)

दरम्यान, आशिया कपबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीमुळे वादाला नक्कीच तोंड फुटण्याची शक्यता आहे. आशिया कपमधील टीम इंडियाच्या जर्सीवर पाकिस्तानचं नाव असणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार भारतीय जर्सीवर पहिल्यांदाच पाकिस्तानचं नाव असणार आहे.

पाकिस्तान हा यंदाच्या आशिया कपचा अधिकृत आयोजक आहे. त्यामुळे सर्व संघाच्या जर्सीवरील आशिया कपच्या लोगाखाली पाकिस्तान असं लिहिलेलं असणार आहे. आशिया कप किंवा आयसीसी स्पर्धेमध्ये वापरण्यात येणाऱ्या जर्सीखाली जो देश स्पर्धेचे आयोजन करत असते त्याचं नाव असतं.

पाकिस्तानमध्ये फक्त 4 सामने

आशिया कप 2023 च्या आयोजनावरून भारत आणि पाकिस्तान यांच्यात बराच काळ वाद झाला होता. बीसीसीआयने पाकिस्तानमध्ये खेळण्यास स्पष्टपणे नकार दिला होता.

त्यामुळे आशिया कप एखाद्या त्रयस्थ ठिकाणी खेळवण्यात यावा अशी मागणी समोर आली होती. मात्र पाकिस्तान यासाठी तयार नव्हता. अखेर एशियन क्रिकेट काऊन्सीलने हस्तक्षेप करत हायब्रीड मॉडेलवर शिक्कामोर्तब केलं होतं

या हायब्रीड मॉडेलनुसार पाकिस्तानमध्ये आशिया कपचे फक्त 4 सामने खेळवले जाणार आहे. तर इतर 13 सामने हे श्रीलंकेत खेळवले जातील. पाकिस्तानला देखील हायब्रीड मॉडेल मान्य करावं लागले. कारण भारताने आशिया कपमधून बाहेर पडण्याची भिती होती.

2 सप्टेंबरला भारत - पाकिस्तान द्वंद्व

आशिाय कपची सुरूवात ही 30 ऑगस्टपासून होणार आहे. पहिला सामना हा पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यात होईल. तर भारत पाकिस्तानचा सामना हा 2 सप्टेंबरला होईल. दोन्ही संघ श्रीलंकेच्या कँडीमध्ये एकमेकांना भिडणार आहेत.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

Germany Hanau Ganesh Festival: हानाऊमध्ये गणेशोत्सवाचा उत्साह; जर्मनीच्या विविध राज्यांतील भारतीय समुदाय एकत्र

Saudi Arabia: सौदी अरेबियाला मदिनामध्ये सापडला 110 दशलक्ष टन युरेनियमचा प्रचंड साठा, इराणशी तणाव अन् अमेरिकेशी अणुकरार

Marathi News Updates : राज्यासह देशभरात दिवसभरात काय काय घडलं? वाचा...

SCROLL FOR NEXT