Team India sakal
क्रीडा

Asia Cup 2023 Ind vs Pak: मोहम्मद शमी अन् सूर्याला कर्णधार रोहितने दिला डच्चू! जाणून घ्या कोणाला मिळाली संधी

तीन दिग्गज भारतीय खेळाडूंना मोठा धक्का

Kiran Mahanavar

Asia Cup 2023 Ind vs Pak : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया कप 2023 चा तिसरा सामना पल्लेकेले येथील पल्लेकेले आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय संघाच्या दोन खेळाडूंना मोठा धक्का बसला आहे.

कर्णधार रोहित शर्माने दोन खेळाडूंना प्लेइंग इलेव्हनमधून वगळले आहे. भारतीय संघ सध्याच्या स्पर्धेत पहिला सामना खेळत आहे, तर पाकिस्तान संघ दुसरा सामना खेळत आहे. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी, सूर्यकुमार यादव आणि अष्टपैलू अक्षर पटेल यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळालेली नाही. रोहितने बुमराह आणि सिराजचा वेगवान गोलंदाज म्हणून संघात समावेश केला आहे, तर हार्दिक पांड्या आणि शार्दुल ठाकूर हे वेगवान गोलंदाज अष्टपैलू म्हणून आहेत. फिरकी विभागाची जबाबदारी जडेजा आणि कुलदीप यादव यांच्या खांद्यावर असणार आहे.

भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

पाकिस्तान : फखर जमान, इमाम उल हक, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), आगा सलमान, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, हरिस रौफ.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jharkhand High Court Verdict : ऑफिसमधील चहा पावडर घरी नेली अन् १७ वर्षांची नोकरी गमावली; हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

Gokul Election : ठरावाच्या हिशोबात म्हशीपेक्षा रेडकू मोठं, ‘गोकुळ’मध्ये ४८४४ सभासदांचे ५४३९ ठराव; एकाच्या नावावर ८

WhatsAppवरून मोबाईल नंबर होणार गायब? पण 'युजरनेम फीचर'ला केंद्र सरकारचा ब्रेक; नेमका धोका काय?

Latest Marathi News Live Update : धावपट्टीला स्पर्श करताच विमानाने घेतले पुन्हा हवेत उड्डाण

Kolhapur Crime : एक कोटी दे, मग बांधकाम कर; बिल्डरचं अपहरण, संशयिताने लढवलेली महापालिकेची निवडणूक

SCROLL FOR NEXT