Asia Cup 2023 Rohit Sharma 
क्रीडा

Asia Cup 2023 : 'वर्ल्ड कपसाठी आमचे 15 खेळाडू कोण...' नेपाळवर विजय मिळवल्यानंतरही रोहितचे मोठे वक्तव्य

Kiran Mahanavar

World Cup Team India : नेपाळचा 10 गडी राखून पराभव करत भारताने आशिया कपच्या सुपर-4 फेरीत स्थान पक्के केले आहे. या सामन्यात पावसामुळे अडथळा आला पण भारताला नंतर 23 षटकांत 145 धावांचे लक्ष्य मिळाले, जे रोहित शर्मा आणि शुभमन गिल या सलामीच्या जोडीने 17 चेंडू शिल्लक असताना एकही विकेट न गमावता पूर्ण केले.

यासह पाकिस्तानपाठोपाठ भारत ‘अ’ गटातून सुपर-4 मध्ये पोहोचला आहे. मात्र या विजयानंतरही रोहित शर्मा संघाच्या कामगिरीवर नाराज दिसला. पण वर्ल्ड कपसाठी कोणते 15 खेळाडू असतील यावर मोठे वक्तव्य केले.

नेपाळविरुद्धच्या सामन्यात भारताने पहिल्या पाच षटकांत तीन झेल सोडले. विराट कोहली, श्रेयस अय्यर आणि इशान किशन यांनी अतिशय सोपे झेल सोडले. सामना संपल्यानंतर रोहितने टीम इंडियाच्या खराब क्षेत्ररक्षणावर संताप व्यक्त केला.

रोहित म्हणाला, "आम्ही सुपर-4 मध्ये चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करू. पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या सामन्यात 4 विकेट्स बाद झाल्यानंतर हार्दिक आणि इशान किशन यांनी ज्या पद्धतीने फलंदाजी केली ती शानदार होती. आजच्या सामन्यात आमची गोलंदाजी ठीक होती पण आम्ही आणखी चांगली कामगिरी करू शकलो असतो. पण क्षेत्ररक्षण खराब होते. त्यात सुधारणा करायची आहे.

जेव्हा रोहितला विचारण्यात आले की तो त्याच्या खेळीबद्दल आनंदी आहे का, तेव्हा तो म्हणाला नाही, सुरुवातीला थोडी अस्वस्थता होती पण माझा प्रयत्न संघाला सुपर-4 मध्ये नेण्याचा होता. फ्लिक स्वीपबाबत तो म्हणाला की, मी हा शॉट जाणूनबुजून खेळला नाही. मला शॉर्ट फाइन लेगवर चेंडू खेळायचा होता पण चेंडू बॅटवर आला आणि थोडा लांब जात होता.

वर्ल्ड कप संघाशी संबंधित प्रश्नावर तो म्हणाला, 'जेव्हा आम्ही येथे आलो तेव्हा आम्हाला माहित होते की वर्ल्ड कपसाठी आमचे 15 खेळाडू कोण असणार आहेत? आशिया कप आमच्यासाठी चांगले चित्र देणार नाही कारण आमच्या गट टप्प्यात फक्त दोन सामने होते. पण सुदैवाने नेपाळविरुद्धच्या सामन्यात फलंदाजी आणि गोलंदाजीची संधी मिळाली. अजून खूप काम करायचे आहे. "अनेक खेळाडू दुखापतीतून परतत आहेत आणि त्यांना लयीत येण्यासाठी वेळ हवा आहे."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICAI CA Final Result 2025 : आयसीएआय सीएचा परीक्षेचा निकाल जाहीर, जाणून घ्या कुठे आणि कसा पाहू शकता?

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : नारायण गडावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील व महंत शिवाजी महाराज यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न

ठरलं! 'चला हवा येऊ द्या' या दिवशी सुरु होणार... विनोदाच्या गँगवारमधून यंदा भाऊ कदम गायब?

जगातील सर्वात महाग अश्रू! उंटाच्या अश्रूच्या एक थेंबात 26 सापांचे विष नष्ट करण्याची ताकद, संशोधनातून माहिती समोर...

Ashadhi Ekadashi 2025 : देवशयनी आषाढी एकादशी; विठ्ठल भक्तीचा महापर्व, एकात्मता भक्ती व समर्पणाचे प्रतीक

SCROLL FOR NEXT