Asia Cup 2023 Team India Squad esakal
क्रीडा

Asia Cup 2023 : रोहित शर्मामुळे आशिया कपसाठी भारताची संघ निवड अणखी लांबली?

अनिरुद्ध संकपाळ

Asia Cup 2023 Team India Squad : भारताच्या आशिया कपसाठीच्या संघनिवडीला काही मुहूर्त लागत नाहीये. भारतीय निवडसमितीची बैठक पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली. या बैठकीला रोहित शर्मा देखील उपस्थित राहणार आहे. त्यामुळे बैठक ही 24 तास पुढे ढकलण्यात आली आहे. अजित आगरकरच्या नेतृत्वाखालील निवडसमितीला देखील 21 ऑगस्टला बैठक होणार आहे हे कळवण्यात आले आहे. आयर्लंड दौऱ्यावरील काही सामने देखील होतील.

यापूर्वी भारतीय निवडसमिती 20 ऑगस्टला होणार होती. मात्र याच दिवशी भारत आणि आयर्लंड यांच्यातील दुसरा टी 20 सामना आहे. या सामन्यात जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा, तिलक वर्मा आणि संजू सॅसमन खेळणार आहेत. या खेळाडूंच्या कामगिरीवर देखील निवडसमितीचे लक्ष आहे.

आशिया कप आणि वर्ल्डकप संघ निवडीबाबत निर्णय घेताना निवडसमितीसमोर केएल राहुल आणि श्रेयस अय्यर यांच्यावरच जास्त फोकस असणार आहे. दोघेही दुखापतीनंतर संघात पुनरागमन करण्याचा प्रयत्न करत आहेत. ते सध्या एनसीएमध्ये रिहॅबिलिटेशन करत आहेत. त्याच्या फिटनेसची चाचणी ही आशिया कपमध्येच होणार आहे.

राहुल आणि श्रेयस हे दोघे संघात नसल्याने भारताची मधलीफळी कमकूवत झाली आहे. भारतीय संघाला अजूनही चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करणारा खेळाडू मिळालेला नाही.

सूत्रांनी क्रिकनेक्स्टला दिलेल्या माहितीनुसार, 'केएल राहुल हा फिट झाला आहे आणि निवडीसाठी उपलब्ध आहे. तो सातत्यपूर्ण फलंदाजी आणि विकेटकिपिंग करतोय. फिटनेसच्या दृष्टीकोणातून तो चांगल्या स्थितीत दिसतोय. श्रेयस अय्यरच्या बाबातीत देखील गोष्टी खूप सकारात्मक घडत आहेत.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Blast : दिल्लीतील न्यायालये बॉम्बने उडवण्याची धमकी, सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर; लाल किल्ला स्फोटानंतर राजधानीत पुन्हा खळबळ

Mumbai News: धक्कादायक! मुंबईत विद्यार्थ्यांच्या हॉल तिकिटावर शिव्या अन् आक्षेपार्ह भाषा, चाललंय काय?

Viral Video Omkar Elephant : कांताराचं रुप असलेला ओंकार हत्ती वनतारात जाणार, 'या' निर्णयाने कोकणी रानमाणूस चिडून म्हणाला...

Latest Marathi Breaking News : छत्तीसगड-आंध्र प्रदेश सीमेवर सैनिक आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक, ६ नक्षलवादी ठार

मुश्रीफ-घाटगेंची युती अनपेक्षित नाही, दोघांनी लोकसभेला मला फसवलंय; संजय मंडलिक यांचा आरोप

SCROLL FOR NEXT