Asia Cup Bangladesh Vs Sri Lanka Statement War Between Dasun Shanaka And Khaled Mahmud esakal
क्रीडा

Asia Cup BAN vs SL : सामन्यापूर्वीच श्रीलंकेचा कर्णधार - बांगलादेशचे डायरेक्टर भिडले, पाहा VIDEO

अनिरुद्ध संकपाळ

Asia Cup BAN vs SL : आशिया कपमध्ये आज बांगलादेश आणि श्रीलंका याच्यात सामना होणार आहे. ग्रुप B मध्ये अफगाणिस्तानने या दोन्ही संघांचा पराभव करत आधीच सुपर 4 फेरी गाठली आहे. त्यामुळे या ग्रुपमधून दुसरा कोणता संघ सुपर 4 साठी पात्र होण्यासाठी आजचा सामना महत्वाचा आहे. मात्र सामन्यापूर्वीच बांगलादेश आणि श्रीलंका एकमेकांनी भिडली. श्रीलंकेचा कर्णधार आणि बांगलादेशचे प्रशिक्षक यांच्यात शाब्दिक द्वंद्व रंगले.

सर्वात प्रथम पत्रकार परिषदेत श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाकाने (Dasun Shanaka) वक्तव्य केले की बांगलादेशकडे आंतरराष्ट्रीय स्तरावरील मुस्तफिजूर रहीम आणि शाकिब अल हसन हे फक्त 2 गोलंदाज आहेत. अफगाणिस्तानच्या तुलनेत बांगलादेशचे आव्हान तसे सोपे आहे. याला बांगलादेश संघाचे डायरेक्टर खालिद महमूद (Khaled Mahmud) यांनी पत्रकार परिषदेतच प्रत्युत्तर दिले.

महमूद प्रत्युत्तर देताना म्हणाले की, 'बांगलादेशकडे शाकीब आणि मुस्तफिजूर हे दोघं तरी आहेत मात्र श्रीलंकेकडे, कर्णधार शनाकाकडे एकही आंतरराष्ट्रीय स्तरावरील गोलंदाज नाहीये.' बांगलादेश आणि श्रीलंका या दोन्ही संघात झालेले हे वाकयुद्ध पाहता आजचा श्रीलंका - बांगलादेश सामना हा चुरशीने खेळला जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राष्ट्रपतींचे माजी ADC मेजर ऋषभ सिंह संब्याल यांनी घेतली ३०व्या वर्षी निवृत्ती; १२ वर्षांच्या सेवेनंतर किती पेन्शन मिळणार?

ZIM vs AUS : सचिन तेंडुलकरचा 'तो' विक्रम, आता त्याचा राहीला नाही! झिम्बाब्वेच्या ब्रेंडन टेलरचा वन डे क्रिकेटमध्ये मोठा पराक्रम

US Student Visa Update: भारतीय विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांच्या चार वर्षांच्या व्हिसा नियमांना स्थगिती

Pakistan Cricket : पाकिस्तानात शाहिद आफ्रिदीच्या नावावरून पसरलीय अफवा; नेमकं काय घडलं?

कोकणात मध्यरात्री बाप्पाची ‘चोरी’ होते? दारात गणपती ठेवून फटाके फोडण्यामागचं कारण ऐकून व्हाल भावूक!

SCROLL FOR NEXT