Asian Athletics Championships 2023  Sakal
क्रीडा

Asian Athletics Championships 2023 : आशियाई ॲथलेटिक्स स्पर्धेला आजपासून बँकॉकमध्ये सुरुवात

माघार, डोपिंगनंतरही भारतीय संघ आशावादी

सकाळ वृत्तसेवा

बँकॉक : सोमवारी झालेल्या आशियाई ॲथलेटिक्स संघटनेच्या पुरस्कार सोहळ्यात भारतीय ॲथलेटिक्स महासंघाला आशियातील सर्वोत्तम ॲथलेटिक्स महासंघाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्याच वेळी भारतीय संघातील तीन प्रमुख खेळाडूंनी दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घेतल्याचे जाहीर करण्यात आले.

या धक्क्यातून भारतीय संघ सावरत नाही, तोच आणखी दोन खेळाडू डोपिंगमध्ये अडकल्याचे वृत्त आले. असे असूनही उद्यापासून सुरू होत असलेल्या २४ व्या आशियाई ॲथलेटिक्स स्पर्धेत भारतीय संघाला सर्वोत्तम कामगिरीची अपेक्षा आहे.

आशियाई ॲथलेटिक्स स्पर्धेला १९७३ पासून सुरुवात झाली. तेव्हापासून भारताने प्रत्येक भाग घेतला आहे. गेल्या वेळी दोहामध्ये दोन सुवर्णपदकांसह १६ पदके जिंकली होती. या वेळी भारताने प्रथम ५४ खेळाडूंचा संघ जाहीर केला होता.

त्यातील गोळाफेकपटू करनवीर सिंग प्रथम डोपिंगमध्ये अडकला, तर चारशे मीटरचा राष्ट्रीय विक्रमवीर महम्मद अनस आश्चर्यकारकरीत्या बाहेर पडला. प्रवीण चित्रावेल, जेस्विन अल्ड्रिन व रोहित यादव हे दुखापतीमुळे बाहेर पडले.

सोमवारी रात्री जे दोन खेळाडू डोपिंगमध्ये अडकले, त्यापैकी एक चारशे मीटरची धावपटू अंजली देवी असल्याच्या वृत्ताला महासंघाच्या अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे. दुसरी धावपटू भारतीय संघात नसून ती दक्षिणेतील आघाडीची स्प्रिंटर आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर भारताची सुवर्णपदकाची मदार प्रामुख्याने गोळाफेकपटू ताजिंदरपाल सिंग तूर, मुरली श्रीशंकर, ज्योती यराजी यांच्यावर आहे. जेस्विन अल्ड्रिनच्या अनुपस्थितीत श्रीशंकर मुरलीच्या खांद्यावर लांब उडीत सुवर्णपदक मिळवण्याची जबाबदारी आहे. पॅरिस डायमंड लीगमध्ये तिसरे स्थान मिळविणाऱ्या श्रीशंकरने यंदा ८.४१ मीटर अशी सर्वोत्तम उडी मारली आहे.

गोळाफेकीत आशियाई विक्रमवीर, विद्यमान विजेता ताजिंदरपाल सिंग तूर सुवर्णपदकाचा प्रबळ दावेदार आहे. मे महिन्यात रांची येथे झालेल्या स्पर्धेत त्याने २१.७७ मीटर अशी कामगिरी करीत आशियाई क्रीडा स्पर्धेचेही पात्रता गाठली आहे.

पुढील महिन्यात होणाऱ्या जागतिक स्पर्धेमुळे नीरज चोप्राने आशियाई ॲथलेटिक्स स्पर्धेत भाग न घेण्याचा निर्णय घेतला. त्यातच रोहित यादव जायबंदी झाला. त्यामुळे डी. पी. मनू हा एकमेव भारतीय सहभागी होणार आहे.

८४.३३ मीटर अशी त्याची यंदाची सर्वोत्तम कामगिरी आहे व सध्या तरी तो आशियात आघाडीवर आहे. चित्रावेलच्या माघारीमुळे अब्दुला अबुबकर हा तिहेरी उडीत पदक जिंकेल का, असा प्रश्न आहे. डेकॅथलॉनलाही उद्यापासूनच सुरुवात होत असून उंच उडीतील माजी राष्ट्रीय विजेता तेजस्विन शंकर डेकॅथलॉनमध्ये आपले नशीब अजमावणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT