Asian Athletics Championships Lord Hanuman Mascot esakal
क्रीडा

Lord Hanuman Mascot : थायलंडमध्ये होणाऱ्या एशियन अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपसाठी हनुमान अधिकृत शुभंकर

अनिरुद्ध संकपाळ

Asian Athletics Championships Lord Hanuman Mascot : भारत हनुमानाची भक्तीभावाने पूजा केली जाते. हनुमान हा शक्तीचा आणि भक्तीचा देवता म्हणून ओळखला जातो. आता हेच हनुमान थायलंड येथे होणाऱ्या एशियन अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपसाठी अधिकृत शुभंकर असणार आहे. ही स्पर्धा बँकॉक येथे बुधवारपासून सुरू होणार आहे.

अ‍ॅथलेटिक्स एशियन असोसिएशनने आपल्या वेबसाईटवर सांगितले की, 'हनुमान यांनी प्रभू रामचंद्रांच्या सेवेत असताना आपल्या वेग, शक्ती, साहस आणि सूज्ञपणाचे प्रदर्शन केले होते. हनुमानाचे सर्वात महत्वाचे गुण हे त्याची निष्ठा आणि भक्ती आहेत.'

'25 व्या एशियन अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप 2023 चा लोगो हा सहभागी खेळाडूंचे कौशल्य, सांघिक कामगिरी, चपळपणा, समर्पण, खिलाडूवृत्तीचं प्रतिक आहे.'

भारतीय अ‍ॅथलेटिक्स संघाचे नेतृत्व हे गोळाफेकपटू तजिंदरपाल सिंग तोमर करणार आहे. त्याच्या सोबत लांब उडीपटू मुरली श्रीशंकर देखील या स्पर्धेत सहभागी होणार आहे. या स्पर्धेत भारतीय खेळाडू प्रभावी कामगिरी करतील अशी आशा आहे. पाच दिवस चालणाऱ्या एशियन अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप 2023 मध्ये सहभागी होण्यासाठी भारतीय संघ रवाना झाला आहे.

(Sports Latest news)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe : कामातचं नाही सोशल मीडियावरही तुकाराम मुंढेंचा जलवा; देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, विश्वास नांगरे- पाटलांना टाकलं मागे

Nipani Tavandi Ghat Case : राष्ट्रीय महामार्गावरील तवंदी घाटाजवळ दगडाने ठेचून गडहिंग्लज साखर कारखान्यातील कर्मचाऱ्याचा खून; महमदवर धारदार शस्रानेही हल्ला

China Nepal Border: मृत्यूचे तांडव डोळ्यांसमोर पाहतोय! प्रत्यक्षदर्शीचा अनुभव; चीन-नेपाळ सीमेवर अडकले राज्यातील ४०० भाविक

Marathi News Live Updates : २०२७च्या जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र रकान्याची मागणी, राज्यस्तरीय मोर्चासह देशव्यापी आंदोलनाची तयारी

Sarvajan Pension Scheme: वृद्ध, विधवा अन् दिव्यांगांना दर महिन्याला थेट खात्यात पेन्शन; ‘सर्वजन पेन्शन योजने’साठी पात्रता काय?

SCROLL FOR NEXT