asian boxing championship lovlina borgohain alfiya pathan march into finals of asian elite boxing championships sakal
क्रीडा

Asian Boxing Championship : लवलिना, अल्फियाचा दमदार ठोसा!

आशियाई बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धा : सुवर्णपदकाच्या दिशेने वाटचाल

सकाळ वृत्तसेवा

अम्मान : भारतीय महिला खेळाडूंनी आशियाई एलिट अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. लवलिना बोर्गोहेन हिने ७५ किलो वजनी गटात; तर अल्फिया पठाण हिने ८१ पेक्षा जास्त किलो वजनी गटात अंतिम फेरीत धडक मारत सुवर्णपदक पटकावण्याच्या दिशेने वाटचाल केली आहे. लवलिना व दक्षिण कोरियाची सियोंग सुयोन यांच्यामध्ये महिला विभागातील ७५ किलो वजनी गटाची उपांत्य फेरी रंगली. लवलिनाच्या आक्रमक खेळासमोर सुयोन हिचा निभाव लागला नाही. लवलिना हिने या लढतीत ५-० असा सहज विजय साकारला आणि अंतिम फेरीत पाऊल टाकले. अल्फियासमोर उपांत्य फेरीच्या लढतीत कझाकस्तानच्या लझ्झत कुंगईबायेवा हिचे आव्हान होते. याही लढतीत भारताच्याच खेळाडूने एकतर्फी बाजी मारत; लझ्झतला ५-० असे सहज पराभूत केले.

अंकुशिता बोरोचा पराभव

अंकुशिता बोरो हिला ६६ किलो वजनी गटात उझ्बेकिस्तानच्या खामीदोवा नवबाखोर हिचा सामना करावा लागला. उझ्बेकीस्तानच्या खेळाडूने ही लढत ४-१ अशी जिंकत अंतिम फेरीत वाटचाल केली. अंकुशिता बोरो हिला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले.

महिलांची जागतिक अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धा पुढील वर्षी भारतात

नवी दिल्ली : पुढील वर्षी महिलांची जागतिक अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धा भारतात आयोजित करण्यात येणार आहे. भारताने आतापर्यंत तीन वेळा महिलांची जागतिक अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धा भरवली आहे. भारतात पहिल्यांदा २००८ मध्ये ही स्पर्धा भरविण्यात आली होती, तर त्यानंतर २०१८ मध्ये ही स्पर्धा पुन्हा भारतातच झाली होती.

भारतीय बॉक्सिंग फेडरेशनचे (बीएफआय) सरचिटणीस हेमांता कलिता म्हणाले की, ‘‘महिलांच्या जागतिक स्पर्धेचे आयोजन दिल्लीमधील जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये करण्यात येईल. मार्च महिन्याच्या शेवटी किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात ही स्पर्धा होईल. जागतिक बॉक्सिंग संघटनेचे (आयबीए) अध्यक्ष उमर क्रेमलेव्ह यांच्याशी सविस्तर चर्चा झाल्यावर आम्ही स्पर्धेच्या अंतिम तारखा जाहीर करणार करणार आहोत.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: अस्वस्थ एकनाथ शिंदेंची अमित शाहांकडे नाराजी? थेट मुद्द्यालाच हात घातल्याची माहिती; इकडे फडणवीस-पवारांची गुप्त बैठक

Ayurvedic Kadha for Winter: थंडीमुळे सर्दी-खोकला आणि अंगही खाजतंय? 'हा' आयुर्वेदीक काढा आहे सुपर इफेक्टिव्ह!

Pune Cold : पुण्यात सलग तीन दिवस १० अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानाची नोंद

Fact Check: बिबट्या खरंच रणजी ट्रॉफी सामन्यावेळी धरमशाला स्टेडियममध्ये घुसला? जाणून घ्या Viral Video मागचं सत्य

Akola Crime : अल्पवयीन चोरट्याकडून २१.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त; घरफोडी प्रकरणाचा वेगवान उलगडा

SCROLL FOR NEXT