asian champions trophy 2023 final india defeats malaysia 4 3 to win title hockey india sports  sakal
क्रीडा

Asian Champions Trophy : भारताचा हॉकीत विजेतेपदाचा ‘चौकार’; आशियाई चॅम्पियन्स हॉकी स्पर्धेत मलेशियाला हरवले

संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहणाऱ्या भारताने साखळी सामन्यात मलेशियाचा ५-० असा धुव्वा उडवला होता,

सकाळ वृत्तसेवा

चेन्नई : मध्यांतरच्या १-३ अशा पिछाडीनंतर एका मिनिटात दोन गोल आणि अंतिम क्षणी निर्णायक गोल करणाऱ्या भारताने मलेशियाचा ४-३ असा पराभव केला आणि आशियाई चॅम्पियन्स हॉकी स्पर्धेत चौथ्यांदा विजेतेपद मिळवले.

संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहणाऱ्या भारताने साखळी सामन्यात मलेशियाचा ५-० असा धुव्वा उडवला होता, मात्र आजच्या अंतिम सामन्यात विजेतेपदासाठी कमालीचा संघर्ष करावा लागला. भारताकडून आज करण्यात आलेले चारही गोल वेगवेगळ्या खेळाडूंनी केले.

ज्युगराग सिंग, कर्णधार हरमनप्रीत सिंग, गुरजंत सिंग आणि आकाशदीप सिंग यांनी गोल केले. यातील हरमनप्रीत आणि गुरजंत सिंग यांनी एका मिनिटात केलेले गोल भारताचा जीवदान देणारे ठरले.

शुक्रवारी जपानचा ५-० असा धुव्वा उडवणाऱ्या भारतीय संघाचा आत्मविश्वास आजच्या अंतिम सामन्यासाठी उंचावला होता. सामन्यात तशी शानदार सुरुवातही केली आणि नवव्याच मिनिटाला ज्युगराजने गोल केला.

त्यानंतर भारताला पेनल्टी कॉर्नर मिळत गेले; परंतु गोल काही त्यावर होत नव्हते. साखळी सामन्यातील अनुभवातून मलेशियाने आज आपला बचाव भक्कम केला होता. या दरम्यान कर्णधार हरमनप्रीत सिंग प्रयत्न करत होता; परंतु यश येत नव्हते.

१४ व्या मिनिटाला अबू आरझीने मलेशियाचे खाते उघडले. त्यानंतर पुढच्या १२ मिनिटांत मलेशियाने आणखी दोन गोल केले आणि मध्यांतराला ३-१ अशी आघाडी घेतली.

दोन गोलांच्या पिछाडीनंतर भारतीय संघ दडपणाखाली आला होता, पण ४५ व्या मिनिटाला हरमनप्रीत आणि गुरजंत सिंग यांनी गोल करताच स्टेडियममध्ये जल्लोषाला उधाण आले. गोलफलक ३-३ अशा बरोबरीत होता.

निर्णायक गोल करण्यासाठी भारतीयांकडून अधिक जोर लावण्यात येत होता. या दरम्यान हरमनप्रीतकडून एक संधी वाया गेली; परंतु आकाशदीप सिंगने ५६ व्या मिनिटाला गोल केला आणि भारताला ४-३ अशी आघाडी मिळवून दिली.

पुढच्या चार मिनिटांच्या खेळात भारतीयांनी आक्रमणाची धार अधिक तेज केली, त्यामुळे मलेशियाला प्रत्युत्तर देण्याची संधीच मिळाली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Crime:'पैशांवरून पत्नीचा खून; पतीस जन्मठेप'; गॅस टाकीसाठी ठेवलेले पैसे पतीने दारुत उडवले, नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update: डिश बसवताना डोक्यावर पडली वीट

आम्ही सगळे थोडे घाबरलोय कारण... वहिनी कतरिना कैफच्या प्रेग्नन्सीबद्दल काय म्हणाला विकी कौशलचा भाऊ सानी कौशल?

OBC Reservation : धनगर समाजाने सत्ता काबीज करुन ओबीसींचं आरक्षण वाढवावं; प्रकाश आंबेडकरांनी सांगितला नवा फॉर्म्युला

Solapur News: सोलापुरात पूर ओसरल्यानंतरही डेंगी-टायफॉईडचा प्रादुर्भाव; मनपाकडून घरोघरी तपासणी सुरू

SCROLL FOR NEXT