Asian Games 2023 Indian Cricket Team esakal
क्रीडा

Asian Games 2023 : बीसीसीआयचा यू टर्न! एशियन गेम्ससाठी संघ पाठवणार मात्र...

अनिरुद्ध संकपाळ

Asian Games 2023 Indian Cricket Team : बीसीसीआयने एशियन गेम्स 2023 मध्ये सहभागी होण्याबाबत नकारघंटा वाजवली होती. मात्र आता आपली भुमिका बदलली असून बीसीसीआय एशियन गेम्स 2023 साठी आपले दोन्ही पुरूष आणि महिला संघ पाठवणार आहे. एशियन गेम्समधील सामने टी 20 फॉरमॅटमध्ये खेळली जाईल.

द इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या माहितीनुसार भारताचा मुख्य संघ मायदेशात होणाऱ्या वनडे वर्ल्डकप खेळणार आहे. त्यामुळे बीसीसीआय एशियन गेम्ससाठी पुरूषांचा ब संघ पाठवणार आहे. तर भारताचा मुख्य महिला संघ एशियन गेम्समध्ये सहभागी होईल.

एशियन्स गेम्स 2023 चीनच्या हांगचोऊ येथे 23 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर या दरम्यान होणार आहेत. आयसीसी वनडे वर्ल्डकप हा 5 ऑक्टोबर पासून 23 नोव्हेंबरपर्यंत होणार आहे.

30 जूनपूर्वी बीसीसीआय आपल्या दोन्ही संघाची यादी भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनला पाठवणार आहे. 2010 आणि 2014 या दोन्ही एशियन गेम्समध्ये क्रिकेटचा समावेश करण्यात आला होता. मात्र भारताने आपला संघ पाठवला नव्हता.

हांगचोऊ येथे होणाऱ्या एशियन गेम्समध्ये क्रिकेटचा समावेश करण्यात आला. ही स्पर्धा गेल्या वर्षी होणार होती. मात्र चीनच्या झिरो कोव्हिड पॉलिसीमुळे ही स्पर्धा पुढे ढकलण्यात आली. जकार्ता येथे 2018 ला झालेल्या एशियन गेम्समधून क्रिकेट वगळण्यात आले होते.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Best Election Results: ठाकरे ब्रँडला एकटे प्रसाद लाड कसे ठरले वरचढ? मुंबईतल्या 'बेस्ट'च्या निवडणुकीचा निकाल

Nashik Crime : अघोरी शक्तीच्या नावाखाली अल्पवयीन मुलीचा विनयभंग; नाशिकमध्ये भोंदूबाबावर पोक्सोचा गुन्हा

'पहाटेची वेळ आणि बसमध्ये पुरुषांचे घाणेरडे स्पर्श' भारती सिंहने सांगितला भयंकर अनुभव म्हणाली...'त्याने मला घट्ट पकडलं आणि...'

Rain-Maharashtra Latest Live News Update: नांदेडमध्ये पुरामुळे लाखो हेक्टर वरील शेती पिकांचे नुकसान

Pune News : गणेशोत्सवात गुन्हेगारीला ‘नो एन्ट्री’ ! पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांचा सराईत गुन्हेगारांना इशारा

SCROLL FOR NEXT