Asian Games 2023 Hockey India Crush Uzbekistan 
क्रीडा

Asian Games 2023 Hockey : हॉकीमध्ये उझबेकिस्तानविरुद्ध भारताने पाडला गोलांचा पाऊस, १६-० ने केला पराभव

हॉकीमध्ये भारताची धमाकेदार सुरुवात!

Kiran Mahanavar

Asian Games 2023 Hockey India Crush Uzbekistan : चीनच्या हांगझोऊ येथे सुरू असलेल्या 19व्या आशियाई क्रीडा स्पर्धेचा पहिल्या दिवशी भारताने धमाकेदार सुरुवात केली. आतापर्यंत भारताला 5 पदके मिळाली आहेत.

भारताचे पदकाचे खाते उघडले असले तरी सुवर्णपदक येणे बाकी आहे. भारतीय खेळाडूंनी आतापर्यंत 3 रौप्य आणि 2 कांस्य पदके जिंकली आहेत. रोइंग संघाने 2 रौप्य आणि एक कांस्य पदक जिंकले, तर एअर रायफल संघाने एक रौप्य आणि एअर रायफलमध्ये दुसरे कांस्य पदक जिंकले.

यादरम्यान हॉकीमध्ये भारतीय पुरुष संघाने उझबेकिस्तानचा 16-0 असा पराभव करून आपल्या मोहिमेची शानदार सुरुवात केली. भारताकडून ललित उपाध्यायने सर्वाधिक चार गोल केले. तर वरुण कुमार आणि मनदीप सिंग यांनी प्रत्येकी 3 गोल केले. आता पुढील सामन्यात भारताचा सामना सिंगापूरशी होणार आहे.

सामन्यात सुरुवातीपासूनच भारताने चेंडूवर आपले नियंत्रण राखले. ललित कुमार उपाध्यायने सामन्याच्या सातव्या मिनिटाला भारतासाठी पहिला गोल केला. दरम्यान भारताने आणखी एक गोल करत 2-0 अशी आघाडी घेतली. जेव्हा भारतीय खेळाडू वरुणने आपल्या ड्रॅग फ्लिकचे गोलमध्ये रूपांतर केले.

अशाप्रकारे, पहिल्या क्वार्टरपर्यंत ललित आणि वरुणच्या गोलमुळे भारताने 2-0 अशी आघाडी घेतली. दुसऱ्या क्वार्टरमध्ये भारतीय संघाने आक्रमण आणि बचावामुळे उझबेकिस्तानवर दबाव कायम ठेवला.

दुसऱ्या क्वार्टरला सुरुवात होऊन दोनच मिनिटे झाले असताना अभिषेकने गोल केला आणि 3-0 अशी आघाडी घेतली. पुढच्याच मिनिटाला मनदीप सिंगने उत्कृष्ट पास गोलपोस्टमध्ये पाठवून संघाची गोलची संख्या वाढवली. सामन्याच्या 24व्या मिनिटाला ललित कुमार उपाध्यायने आणखी एक गोल करत संघाची धावसंख्या 5-0 अशी नेली. अशा प्रकारे भारत विरुद्ध उझबेकिस्तान सामना एकतर्फी झाला होता.

मनदीप सिंगने 27व्या आणि 28व्या मिनिटाला दोन बॅक टू बॅक गोल करत केले. भारताने पहिल्या हाफपर्यंत 7-0 अशी आघाडी कायम ठेवली आणि उझबेकिस्तानला गोल करण्याची एकही संधी दिली नाही.

दुसऱ्या हाफमध्ये भारतीय संघाने आपला दबदबा कायम ठेवत उझबेकिस्तानच्या खेळाडूंना संधी दिली नाही. अशा प्रकारे आशियाई खेळ 2023 मध्ये भारतीय हॉकी संघाने उझबेकिस्तानचा 16-0 असा पराभव करून शानदार सुरुवात केली.

भारतीय पुरुष हॉकी संघ आता आपला पुढील सामना सिंगापूरविरुद्ध खेळणार आहे, जो मंगळवार, २६ सप्टेंबर रोजी खेळवला जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Accident News : कोल्हापूरमध्ये सातेरीच्या दरीत पाचशे फुट चारचाकी कोसळली, वाहनात पती पत्नी; बचावकार्य सुरू

Arbaaz Khan Blessed with a Baby Girl: अरबाज खान पुन्हा बाबा झाला, शूराने दिला गोंडस मुलीला जन्म

Latest Marathi News Live Update : आमदार बापू पठारे धक्काबुक्कीप्रकरणी बंडू खांदवेसह २० जणांवर गुन्हा दाखल

भाजप आमदार तडीपार गुंडाच्या कार्यक्रमात, दमदाटी करणाऱ्यांना लाथा घालण्याचा 'सल्ला'; पक्ष अन् पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

कोणी तरी येणार येणार गं! भारती सिंग पुन्हा आई होणार, चाहत्यांना दिली गुडन्यूज, म्हणाली...'आम्ही पुन्हा प्रेग्नेंट'

SCROLL FOR NEXT