Asian Games 2023 Medals Tally esakal
क्रीडा

Asian Games 2023 : भारत करणार पदकांची सेंच्युरी! वाचा चीनमध्ये कसा रचला जाणार इतिहास

अनिरुद्ध संकपाळ

Asian Games 2023 Medals Tally : चीनमधील हांगझू येथे होत असलेल्या 19 व्या एशियन गेम्स स्पर्धेत भारताने आपला 655 खेळाडूंचा संच पाठवला होता. यंदाच्या एशियन गेम्समध्ये भारताने 100 पदके जिंकण्याचा निर्धार केला आहे. यापूर्वी भारताने एशियन गेम्समध्ये सर्वाधिक 70 पदके जिंकली होती. मात्र यंदाच्या एशियन गेम्समध्ये भारताने हा विक्रम कधीच मोडून काढला आहे.

आता भारताचे लक्ष्य हे 100 पदके जिंकण्याचं आहे. यंदा भारताने सुरूवात संथ केली मात्र दिवसागणिक भारताने आपला पदक जिंकण्याचा वेग चांगलाच वाढवला. गुरूवारी 11 व्या दिवशी भारताच्या खिशात तब्बल 86 मेडल्स आल्या आहेत. स्पर्धा संपायला दोनच दिवस शिल्लक आहेत आणि भारताला अजून 14 पदके जिंकायची आहेत. मात्र हे शक्य आहे.

कापाऊंड आर्चरी 4 पदके

भारताने आर्चरीमध्ये आधीच तीन पदके जिंकली आहेत तर तीन पदके निश्चित आहेत. महिला वैयक्तिकमध्ये ज्योती वेन्नम अंतिम फेरीत पोहचली आहे. तिचे रौप्य पदक निश्चित आहे. तर आदिती गोस्वामी देखील कांस्य पदक जिंकण्यासाठी सज्ज झाली आहे. तर पुरूषांच्या अंतिम फेरीत दोन्ही प्रतिस्पर्धी खेळाडू हे भारताचेच आहेत. त्यामुळे तिथेही सुवर्ण आणि रौप्य पदक निश्चित आहे.

कबड्डी 2 पदके

भारताच्या पुरूष आणि महिला दोन्ही संघ कबड्डीमध्ये सेमी फायनलमध्ये पोहचली आहेत. यावेळी ते कांस्य पदकासाठी सामना होणार नाही. याचा अर्थ भारताचे दोन्ही पदके निश्चित आहेत. गेल्या वर्षी दोन्ही संघांना सुवर्ण पदक जिंकण्यात अपयश आले होते. मात्र यंदा दोन्ही संघ सुवर्णासाठीत आपले सर्वस्व पणाला लावतील.

हॉकी 1 पदक

भारतीय हॉकी संघाने एशियन गेम्सच्या अंतिम फेरीत स्थान मिळवले आहे. त्यांचा सामना जपानशी होणार आहे. भारताचे रौप्य पदक निश्चित आहे. मात्र हॉकी संघाकडून सुवर्णाचीच अपेक्षा आहे. याचबरोबर महिला संघाला देखील कांस्य पदक जिंकण्याची संधी आहेच.

बॅडमिंटन 2 पदके

बॅडमिंटनमध्ये एसएस प्रणॉयने पुरूष एकेरीत सेमी फायनलमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे भारताचे हे पदक निश्चित झाले आहे. याचबरोबर पुरूष दुहेरीत सात्विकसाईराज आणि चिराग शेट्टी यांच्याकडून देखील भारतासाठी पदक निश्चित करतील अशी अपेक्षा आहे.

क्रिकेट 1 पदक

भारतीय पुरूष क्रिकेट संघ उद्या (6 ऑक्टोबर) बांगलादेशविरूद्ध आपला सेमी फायनल सामना खेळणार आहे. जरी उद्याच्या सामन्यात भारताचा पराभव झाला तरी त्यांना कांस्य पदक जिंकण्याची संधी आहे. मात्र भारतीय संघाचा क्रिकेट विश्वातील दबदाबा पाहता त्यांच्याकडून सुवर्ण पदकाचीच अपेक्षा आहे.

कुस्ती 2 पदके

भारताचा बजरंग पुनिया आणि दिपक पुनिया यांच्याकडून कुस्तीत पदकाची अपेक्षा आहे. बजरंगने गेल्या एशियन गेम्समध्ये सुवर्ण पदक जिंकले होते. त्यामुळे त्याच्यावर सर्वांचीच नजर असणार आहे. दीपक पुनियाने देखील दुखापतीनंतर निवड चाचणी सामन्यात जोरदार पुनरागमन केले होते.

बुद्धीबळ 2 पदके

बुद्धीबळात सहाव्या फेरीनंतर भारतीय महिला आणि पुरूष दोन्ही संघ दुसऱ्या स्थानावर आहेत. तिसऱ्या राऊंडनंतरही जर भारतीय संघ आपली आघाडी कायम ठेवू शकले तरी भारताची दोन पदके निश्चित आहेत.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICAI CA Final Result 2025 : आयसीएआय सीएचा परीक्षेचा निकाल जाहीर, जाणून घ्या कुठे आणि कसा पाहू शकता?

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : नारायण गडावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील व महंत शिवाजी महाराज यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न

ठरलं! 'चला हवा येऊ द्या' या दिवशी सुरु होणार... विनोदाच्या गँगवारमधून यंदा भाऊ कदम गायब?

जगातील सर्वात महाग अश्रू! उंटाच्या अश्रूच्या एक थेंबात 26 सापांचे विष नष्ट करण्याची ताकद, संशोधनातून माहिती समोर...

Ashadhi Ekadashi 2025 : देवशयनी आषाढी एकादशी; विठ्ठल भक्तीचा महापर्व, एकात्मता भक्ती व समर्पणाचे प्रतीक

SCROLL FOR NEXT