Asian Games 2023  esakal
क्रीडा

Asian Games 2023 : दोनवेळची चॅम्पियन टीम इंडिया सहभागी होऊ शकत नाही... प्रशिक्षक झाले भावूक

अनिरुद्ध संकपाळ

Asian Games 2023 : भारतीय फुटबॉल संघाचे मुख्य प्रशिक्षक इगोर स्टिमक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे एक खास विनंती केली आहे. त्यांनी सोशल मीडियावर एक भलीमोठी पोस्ट लिहून भारतीय फुटबॉल संघाला एशियन गेम्समध्ये सहभागी होण्यासाठी पंतप्रधानांनी हस्तक्षेप करण्याची विनंती केली.

अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने स्टिमक यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या 23 वर्षाखालील संघ 23 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या एशियन गेम्समध्ये सहभागी होईल.

भारतीय फुटबॉल संघ टॉप 8 संघात सामिल होण्यासाठी क्रीडा मंत्रालयाचे निकष पूर्ण करत नाही. स्टिमक यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, 'मी तुमच्या लक्षात आणून देऊ इच्छितो की 2017 मधील आमचा 17 वर्षाखालील संघ आता 23 वर्षाखालील स्पर्धा खेळत आहे.

त्यांनी 23 वर्षाखालील वर्ल्डकप पात्रता फेरीत देखील चांगली कामगिरी केली आहे. हा संघ खूप गुणवान आहे. आता या संघाला एशियन गेम्समध्ये सहभागी होण्यापासून रोखलं जात आहे.' प्रशिक्षक स्टिमक यांनी पंतप्रधानांसोबतच केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांना देखील विनंती केली.

भारतीय ऑलिम्पिक संघ आणि सर्व राष्ट्रीय खेळ महासंघाना पाठवलेल्या पत्रात क्रीडा मंत्रालयाने म्हटले आहे की, 'सांघिक स्पर्धांमध्ये फक्त अशाच खेळांना सामिल करण्याचा विचार केला जावा जे खेळ आशियातील देशांमध्ये खेळल्या जाणाऱ्या गेल्या एक वर्षामधील स्पर्धेत पहिल्या 8 संघात स्थान मिळवलं आहे.' भारताचा 23 वर्षाखालील भारतीय फुटबॉल संघ 2002 पासून एशियन गेम्समध्ये सहभागी होत आहे.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC चा पेपर कसा फुटला? प्रेमात बिनसलं अन् प्रियकरानेच आयोगाला केला ई-मेल... प्रेमापासून ब्रेकअपपर्यंतची धक्कादायक कहाणी

BABAR AZAM T20I RECORD: बाबर आझमचा मोठा विक्रम; रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मागे टाकत टी-२०मध्ये ठरला नंबर वन

Ajra Bank Employee Tragedy: आजऱ्यात विजेच्या धक्क्याने बॅंक कर्मचाऱ्याचा मृत्यू बांधकामावरील साहित्य उचलताना घटना

Onion Express: लासलगाव ‘कांदा एक्स्प्रेस’चा उडाला बोजवारा! ढिसाळ नियोजन; निम्माच माल घेऊन गाडी ४२ तासांनी दिल्लीकडे रवाना

Chandwad Teacher Vacancies: चांदवडला शिक्षकांची ५५ पदे रिक्त; तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती दयनीय; पालक संतप्त

SCROLL FOR NEXT