Asif Ali and Fareed Ahmad ICC Action sakal
क्रीडा

Asia Cup : आसिफ अली अन् फरीद अहमदवर ICC ची मोठी कारवाई; काय आहे संपूर्ण प्रकरण...

नसीमने पुन्हा षटकार मारला त्यानंतर अत्यंत जोशात पाकने जल्लोष केला हे पाहून स्टेडियममधील अफगाणिस्तान प्रेक्षकांचा संयम सुटला त्यांनी पाकिस्तानी प्रेक्षकांना टार्गेट केले...

Kiran Mahanavar

ICC Action on Asif Ali and Fareed Ahmad : आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत अत्यंत अटीतटीच्या सामन्यात विजय आवाक्यात असताना अफगाणिस्तानला पाकिस्ताविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यात पाकिस्तानचा फलंदाज आसिफ अली आणि अफगाणिस्तानचा वेगवान गोलंदाज फरीद अहमद मलिक यांच्यात हाणामारी झाली. या घटनेची दखल घेत आयसीसीने आसिफ अली आणि फरीद अहमद मलिक यांच्यावर मोठी कारवाई केली आहे. आयसीसीने दोन्ही खेळाडूंना मॅच फीच्या २५ टक्के दंड ठोठावला आहे.

आयसीसीने म्हटले आहे की, आसिफने आंतरराष्ट्रीय सामन्यादरम्यान आयसीसी आचारसंहितेच्या कलम 2.6 चे उल्लंघन केले, जे खेळाडू आणि त्याच्या समर्थन व्यक्तीशी संबंधित आहे. त्याच वेळी फरीदने कलम 2.1.12 तोडले आहे जे खेळाडू, पंच आणि सामनाधिकारी यांच्या अयोग्य शारीरिक वर्तनाशी संबंधित आहे. हे पाहता आयसीसीने दोन्ही खेळाडूंच्या मॅच फीच्या 25 टक्के इतका मोठा दंड ठोठावला आहे.

दुबईत पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात रोमांचक सामना झाला. भर मैदानात खेळाडूंमध्ये हमरीतुमरी झाली, बॅटही उगारण्यात आली. त्यानंतर स्टेडियममध्ये असलेल्या दोन्ही संघांच्या पाठीराख्यांमध्ये जुंपली. पाकिस्तानकडून या घटनेला राजकीय वळण देण्यात येत आहे. या सामन्यात अफगाणिस्तानचा विजय जवळपास निश्चित होता. पाकिस्तानची अखेरची जोडी मैदानात होती, अखेरचे षटक फारूकी टाकत होता. मात्र पाकचा दहाव्या क्रमांकाचा फलंदाज नसीम शाहने दोन षटकार मारून अफगाणिस्तानच्या तोंडचा घास हिरावला.

अफगाणिस्तानचा वेगवान गोलंदाज फरीद अहमद पाकिस्तानचा फलंदाज आसिफ अलीवर चालून जात होता. आसिफनेही त्याला तसेच उत्तर देण्यासाठी बॅट उगारली. भर मैदानात या खेळाडूंमध्ये हाणामारी होण्याची परिस्थिती निर्माण झाली होती. दोन्ही संघांचे पाठीराखे मोठ्या प्रमाणात स्टेडियममध्ये उपस्थित होते आणि आजूबाजूलाही बसले होते. पुढच्याच चेंडूवर नसीमने पुन्हा षटकार मारला. त्यानंतर अत्यंत जोशात त्याने जल्लोष केला. हे पाहून स्टेडियममधील अफगाणिस्तान प्रेक्षकांचा संयम सुटला, त्यांनी पाकिस्तानी प्रेक्षकांना टार्गेट केले.. खुर्च्या उखडून त्यांनी फेकण्यास सुरुवात केली.

सोशल मीडियावर पडसाद मैदान आणि स्टेडियममधील या हाणामारीचे पडसाद नंतर सोशल मीडियावर उमटले. अफगाणिस्तानचे प्रेक्षक असा प्रकार वारंवार करत आहेत, हा खेळ आहे आणि खिलाडूवृत्तीने घेतला पाहिजे. तुमचे खेळाडू आणि प्रेक्षक तुम्ही काही गोष्टी शिकल्या पाहिजेत, असे ट्विट पाकचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने अफगाणिस्तान क्रिकेट मंडळाचे माजी प्रमुख शफिक स्तानिकझाई यांना उद्देशून केले. शफिक यांनीही शोएबला तेवढ्याच कडक शब्दांत उत्तर देताना म्हटले, "पुढच्या वेळी क्रिकेटमध्ये देशाला आणशील तर खबरदार. आम्ही पार्कच्या खेळाडूंना कशी चांगली वागणूक दिली हे तू इंझमामभाई आणि रशीद लतिफ यांना विचार. "

पाकच्या उत्तरेकडील वझिरीस्तानचे खासदार मोहसीन दवार यांनी तर या घटनेला राजकीय वळण दिले. अफगाणिस्तानमध्ये पाकिस्तान हस्तक्षेप करतो म्हणून त्यांचा आमच्यावर राग आहे आणि त्यातून असे प्रकार घडत असतात, असे दवार यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : यापुढे कुणालाही मारलं तर त्याचे व्हिडीओ काढू नका - राज ठाकरे

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

SCROLL FOR NEXT