Sandeep Nangal Ambia Sandeep Nangal Ambia
क्रीडा

आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू संदीप नांगल आंबियाची हत्या; झाडल्या गोळ्या

सकाळ डिजिटल टीम

पंजाबमधील जालंदर जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय कबड्डीपटूची सोमवारी (ता. १४) गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. जालंदरच्या शाहकोटमध्ये अज्ञात व्यक्तीने संदीप नांगल आंबिया (Sandeep Nangal Ambia) याच्यावर सामन्यादरम्यान गोळ्या झाडल्या. त्यानंतर त्याला जखमी अवस्थेत रुग्णालयात नेले असता उपचारादरम्यान मृत्यू झाला. गोळीबारानंतर (fired) घटनास्थळी चेंगराचेंगरी झाली.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, जालंदरच्या (jalandhar) मालियन गावात कबड्डी चषकादरम्यान अज्ञात हल्लेखोरांनी संदीप नांगल आंबिया (Sandeep Nangal Ambia) याच्यावर गोळ्या झाडल्या. गोळी त्याच्या डोक्यात आणि छातीत लागली. संदीप नांगल अंबिया याला गोळी लागल्याने घटनास्थळी चेंगराचेंगरी झाली. घटनेची माहिती मिळताच मोठ्या संख्येने पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला होता.

मलियन कलान गावात कबड्डी स्पर्धा सुरू होती. यावेळी संदीप त्याच्या काही साथीदारांना सोडण्यासाठी बाहेर गेला होता. कबड्डी स्पर्धेच्या सामन्यादरम्यान अचानक अंदाधुंद गोळीबार सुरू झाला. गोळीबारात संदीप नांगर अंबिया (Sandeep Nangal Ambia) याला गोळ्या (fired) लागल्या. हे पाहून उपस्थितांमध्ये चेंगराचेंगरी झाली. कोणाला काही समजण्यापूर्वीच गोळीबार करणारे घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाले.

यावेळी घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी जखमी खेळाडूला चारचाकी वाहनातून रुग्णालयात नेले. मात्र, जास्त रक्तस्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाला. माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी आणि रुग्णालयात दाखल झाले. परिसरातील परिस्थिती चिघळू नये म्हणून वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे.पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी उपस्थित लोकांची विचारपूस केली. आजूबाजूच्या परिसरात नाकाबंदी सुरू करण्यात आली आहे.

मोठा पोलिस बंदोबस्त तैनात

कबड्डीपटूवर आठ ते दहा गोळ्या झाडल्याचा पोलिसांना संशय आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करीत आहेत. समालोचक जीव वाचवण्यासाठी आरडाओरडा करू लागले. या हल्ल्यात आणखी एका तरुणाच्या पायाला गोळी लागली. परिस्थिती बिघडू नये म्हणून वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. अनेक बाबी लक्षात घेऊन पोलिस घटनेचा तपास करीत असल्याचे सांगण्यात येत आहे.

सर्व पैलूंचा तपास सुरू

संदीप नांगल याच्यासोबत काही देवाण-घेवाण किंवा अन्य कारणावरून शत्रुत्व होते का, याचा पोलिस शोध घेत आहेत. मृताच्या नातेवाइकांशी बोलल्यानंतर पोलिसांनी हत्येशी संबंधित सर्व पैलूंचा तपास सुरू केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Career Growth: ज्याला तीन लाख वार्षिक पगाराच्या कामावरून कंपनीने काढलं, त्याच तरुणाला आली दुबईतील १.५ कोटींच्या नोकरीची ऑफर

Sukanya Samruddhi Yojna : घरात तीन मुली आहेत? मग टेन्शन सोडा; जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजनेच्या नियमांतर्गत कशी उभी राहील कोटींची संपत्ती!

पुढच्या सात दिवसांत ४ राशींचं नशीब चमकणार! धनलाभासह करिअरमध्ये प्रगतीचे योग

Prithviraj Chavan : मनोज जरांगे-पाटलांचे नेतृत्व संपवायचे त्याचवेळी एकनाथ शिंदे यांच्यासारख्या नेत्यांना बदनाम करण्याचा कुटील डाव

CBI Arrests ED officers : दुसऱ्यांवर धाडी टाकणाऱ्या ED अधिकाऱ्यांवरच CBI ची झडप! केसमधून वाचवण्यासाठी केला होता 'हा' मोठा सौदा

SCROLL FOR NEXT