क्रीडा

AUS vs PAK 3rd Test : आफ्रिदीला संघातून दाखवला बाहेरचा रस्ता! पाकिस्तानच्या नव्या कर्णधारचा मोठा निर्णय

Australia vs Pakistan 3rd Test News | सामन्यापूर्वी पाकिस्तानचा कर्णधार शान मसूदने घेतला मोठा निर्णय

Kiran Mahanavar

AUS vs PAK 3rd Test : ऑस्ट्रेलियाविरुद्ध पर्थ आणि मेलबर्नमध्ये झालेल्या कसोटी सामन्यांमध्ये लाजिरवाण्या पराभवानंतर आता पाकिस्तानला शेवटचा सामना सिडनीमध्ये खेळायचा आहे.

तीन जानेवारीपासून हा सामना सुरू होणार असून या सामन्यापूर्वी पाकिस्तानचा कर्णधार शान मसूदने मोठा निर्णय घेतला आहे. शाहीन शाह आफ्रिदीला पाकिस्तानी संघातून वगळण्यात आले आहे. सामन्याच्या एक दिवस आधी पाकिस्तानने आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन मोठे बदल केले. ज्यामध्ये इमाम उल हक आणि शाहीन आफ्रिदीला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.

पाकिस्तानने शाहीन आफ्रिदी आणि इमाम उल हक यांना प्लेइंग इलेव्हनमधून का वगळले हा मोठा प्रश्न आहे. खराब फॉर्ममुळे इमाम उल हकला संघात स्थान मिळालेले नाही, तर शाहीन आफ्रिदीला विश्रांती घेण्यास सांगण्यात आले आहे.

शान मसूदने सांगितले की, शाहीन आफ्रिदीने गेल्या एका वर्षात जास्त खेळला आहे आणि आता त्याला विश्रांतीची गरज आहे. पण इथे महत्त्वाची गोष्ट म्हणजे शाहीन आफ्रिदीची कामगिरीही खूपच खराब झाली होती. सिडनी कसोटीत त्याच्या जागी ऑफस्पिनर साजिद खानला संधी देण्यात आली आहे.

श्याम अय्युबची एंट्री

सिडनी कसोटीसाठी पाकिस्तानने 21 वर्षीय श्याम अयुबची निवड केली आहे. अलीकडेच या फलंदाजाने पाकिस्तान कपमध्ये चांगली फलंदाजी केली होती, त्यानंतर त्याला कसोटी संघात स्थान मिळाले.

पाकिस्तानचे प्लेइंग इलेव्हन - अब्दुल्ला शफीक, श्याम अय्युब, शान मसूद, बाबर आझम, सौद शकील, मोहम्मद रिझवान, सलमान अली आगा, साजिद खान, हसन अली, मीर हमजा, आमिर जमाल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games, Archery: भारताच्या लेकींचा सुवर्णवेध! चीनचा धुव्वा अन् थेट वर्ल्ड रेकॉर्ड करत जिंकलं भारतासाठी सातवं गोल्ड मेडल

Pradeep Purnekar Murder : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात दोन संशयित ताब्यात, चौघांचा शोध सुरु; कुटुंबीयांचे शिंदे सेनेच्या नेत्यावर गंभीर आरोप

प्रज्ञाविकासाचा राजमार्ग : उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती : इन्स्पायर-एसएचई

Latest Marathi News Live Update : मुंबईतील १४ फुटांवरील झोपड्यांवरील कारवाईला राष्ट्रवादीचा विरोध

IND vs WI, 2nd ODI: नितीश रेड्डीचा प्रयोग फसला, नबीचं होणार पदार्पण? भारताला मालिका खिशात घालण्याची संधी, कुठे पाहाणार सामना?

SCROLL FOR NEXT