kidnap case E Sakal
क्रीडा

माजी क्रिकेटरच्या किडनॅपिंगमध्ये त्याच्या गर्लफ्रेंडचाच हात?

मारियाने माजी क्रिकेटर्ससोबत ब्रेकअप झाल्याचे म्हटले होते.

सुशांत जाधव

ऑस्ट्रेलियाचे माजी फिरकीपटू स्टुअर्ट मॅकगिल (Stuart MacGill) यांचे अपहरण झाल्याची घटना चांगलीच चर्चेत आली होती. याप्रकरणात पोलिसांनी चौघांना अटकही केली. त्यानंतर आता मॅकगिल यांच्या गर्लफ्रेंडच्या भावाने त्यांच्या अपहरणाचा कट रचल्याची माहिती समोर आली आहे. माजी फिरकीपटूची गर्लफ्रेंड मारिया ओ मेघर हिचा भाऊ मॅरिनो सोटिरोपोलस याच्यासह चौघांना पोलिसांनी अटक केलीये.

डेली टेलीग्राफला दिलेल्या मुलाखतीमध्ये मारियाने माजी क्रिकेटर्ससोबत ब्रेकअप झाल्याचे म्हटले होते. दोघांमधील प्रेमाचे नाते संपले असले तरी मैत्री कायम आहे, असे तिने सांगितले होते. स्वत:ला सुरक्षित वाटत नसल्याचेही तिने या मुलाखतीमध्ये म्हटले होते. त्यामुळे दोघांमध्ये काहीतरी घडले असल्यामुळेच तिच्या भावाने स्टुअर्ट मॅकगिललचे अपहरण करुन त्याला मारहाण केल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामागे मारियाचा हात आहे का? असा प्रश्नही उपस्थिती केला जातोय.

माजी क्रिकेटपटूच्या अपहरण प्रकरणात भावाला अटक झाल्यानंतर मारियाने भावासोबत अधिक सलगी नसल्याचे म्हटले आहे. आम्ही भाऊ-बहिण असलो तरी आमच्या नात्यात गोडवा नाही. आम्ही वेगवेगळे राहतो. मॅकगिल सुरक्षित असून त्याला आता या विषयावर अधिक काहीच बोलायचे नाही. सध्याच्या घडीला मी भयावह परिस्थितीत अडकले आहे. मॅकगिलच्या कुटुंबियांसोबत असल्याचेही त्याने म्हटले आहे.

फॉक्स क्रिकेटच्या वृत्तानुसार, 14 एप्रिल रोजी बंदुकीचा धाक दाखवून मॅकगिल यांचे अपहरण करण्यात आले होते. 46 वर्षीय तरुणाने कारमधून त्यांचे अपहरण केले. एका निर्जन ठिकाणी नेऊन त्यांना मारहाण करण्यात आली. आरोपी हा मॅकगिलच्या गर्लफ्रेंडचा भाऊ असल्याचे आता समोर आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT