WTC Final 2023 ICC Fined Team India  esakal
क्रीडा

WTC Final 2023 ICC Fined : ट्रॉफी जिंकली नाहीच मात्र आता भला मोठा दंडही द्यावा लागणार... ICC ने दिला दणका

अनिरुद्ध संकपाळ

WTC Final 2023 ICC Fined Team India : भारताला सलग दुसऱ्यांदा WTC फायनल गाठून देखील विजेतपद पटकावता आले नाही. ऑस्ट्रेलियाने भारताचा 209 धावांनी पराभव करत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची गदा उचलली. आधीच पराभवाच्या दुःखात असलेल्या भारताला आयसीसीने दुसऱ्याच दिवशी मोठा धक्का दिला.

आयसीसीने भारतीय संघाला संथ गतीने षटके टाकल्याप्रकरणी दंड ठोठावला. भारतीय संघाला संपूर्ण मॅच फीची रक्कम दंड म्हणून भरायची आहे. भारताबरोबरच ऑस्ट्रेलियाला देखील यात नियमाचे उल्लंघन केल्यामुळे सामन्याच्या 80 टक्के रक्कम दंड म्हणून द्यावी लागणार आहे. शुभमन गिलला देखील तिसऱ्या पंचांविरूद्ध ट्विट करणे भोवले असून त्यालाही दंड ठोठावण्यात आला आहे.

भारतीय संघाने WTC Final मध्ये दिलेल्या वेळेत टाकायच्या षटकांपैकी 5 षटके कमी टाकली. तर ऑस्ट्रेलियाने चार षटके कमी टाकली. त्यामुळे या दोन्ही संघांना आयसीसीच्या कोड ऑफ कंडक्टचा नियम क्रमांक 2.22 चे उल्लंघन केल्या प्रकरणी कारवाई झाली आहे. या नियमानुसार प्रत्येक षटकासाठी खेळाडू आणि सपोर्ट स्टाफच्या मॅच फी मधून 20 टक्के रक्कम कापून घेतली जाते.

भारताने 5 षटके टाकल्यामुळे संपूर्ण मॅच फी ही दंड म्हणून द्यावी लागणार आहे. आयसीसीने शुभमन गिलला तिसऱ्या पंचांनी दिलेल्या निर्णयाविरूद्ध ट्विट केल्याबद्दलही शिक्षा दिली आहे. आयसीसी कोड ऑफ कंडक्टचा नियम 2.7 मोडल्याप्रकरणी गिलला मॅच फी च्या 15 टक्के रक्कम दंड आकारण्यात आला आहे. म्हणजे गिलला मॅच फीच्या एकूण 115 टक्के रक्कम दंड म्हणून भरावी लागणार आहे.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT