David Warner Retirement sakal
क्रीडा

David Warner: 'मी निवृत्ती घेणार, पण...'; द्विशतक झळकावणाऱ्या वॉर्नरचे धक्कादायक विधान!

दुसऱ्या कसोटीत द्विशतक झळकावत वॉर्नरने ऑस्ट्रेलियाच्या विजयात मोलाची भूमिका बजावल्यानंतर....

Kiran Mahanavar

David Warner Retirement : ऑस्ट्रेलियन सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या बॉक्सिंग-डे कसोटीत धमाकेदार खेळी केल्यानंतर आपल्या वक्तव्याने सर्वांनाच चकित केले आहे. वॉर्नरने पुढच्या वर्षी होणाऱ्या विश्वचषक 2023 मध्ये खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्याने असेही म्हटले आहे की, जर संघ व्यवस्थापनाने माझा वेळ संपला आहे, तर मी सर्व काही सोडण्यास तयार आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत द्विशतक झळकावत वॉर्नरने ऑस्ट्रेलियाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली होती. यजमानांनी हा सामना एक डाव आणि 182 धावांनी जिंकून तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली.

सामन्यानंतर डेव्हिड वॉर्नर म्हणाला की, सामन्याच ग्रीन आणि स्टार्कची काही उत्कृष्ट गोलंदाजी पाहिली, कॅरीचे शतकही उत्कृष्ट होते. खचाखच भरलेल्या MCG स्टेडियमसमोर 100 वी कसोटी खेळणे ही एक संस्मरणीय गोष्ट होती. ही खेळी माझ्यासाठी खास आहे, मला माहीत होते की मी मोठ्या मंचावर कामगिरी करतो. पुढील वर्षी विश्वचषक खेळण्याचा माझा निर्धार आहे. त्यासाठी मी स्वत:ला तंदुरुस्त ठेवेन आणि धावा करत राहण्याचा प्रयत्न करेन, पण संघ व्यवस्थापनाने मला वेळ आली आहे, असे सांगितले तर मी सर्व काही सोडायला तयार आहे.

मेलबर्न कसोटीपूर्वी डेव्हिड वॉर्नरच्या निवृत्तीची क्रिकेट वर्तुळात जोरदार चर्चा होती. अनेक दिग्गज त्याच्या निवृत्तीची योग्य वेळ सांगत होते, पण या डावखुऱ्या फलंदाजाने महत्त्वाच्या सामन्यात चांगली कामगिरी केली आणि सांगितले की त्याच्यात अजून बरेच क्रिकेट शिल्लक आहे.

ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा आणि अंतिम कसोटी सामना 4 जानेवारी 2023 पासून सुरू होणार आहे. यानंतर ऑस्ट्रेलियन संघ भारताविरुद्ध चार कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shendurwada News : दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीसाठी प्रयत्न; दुष्काळाची तीव्रता पाहता चारा छावण्या सुरू करण्याचे आमदार प्रशांत बंब यांचे आश्वासन

Karad News : साताऱ्यातील तालुक्यात दुष्काळ जाहीर होण्यासाठी शंभूराज देसाई यांची थेट मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे धाव

Ganeshotsav Dhol Tasha : गणेशोत्सवात मुळशीकर ढोल पथकांची कोट्यावधी रुपयांची कमाई; मुंबई, पुण्यात घुमला आवाज

Dog Attack: बीडमध्ये धक्कादायक घटना! मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सहा वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

गोदाघाटावर अघोरी पूजा, महिलेसोबत विचित्र प्रकार; १ लाख ६० हजारांची फसवणूक अन् २१ वर्षीय मुलीचा बळजबरीने साखरपुडा

SCROLL FOR NEXT