IND vs AUS 2nd Test Australia Playing 11 esakal
क्रीडा

IND vs AUS 2nd Test : फिरकी मास्टर टीम इंडियासाठी कांगारूंनी वापरले धक्कातंत्र! धडकी भरवणारा गोलंदाज परतला

अनिरुद्ध संकपाळ

IND vs AUS 2nd Test Australia Playing 11 : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याची दोन्ही संघ जय्यत तयारी करत आहे. भारताने पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा 1 डाव आणि 132 धावांनी पराभव केला. भारतीय फिरकीपटूंनी कांगारूंचा पहिला डाव 177 तर दुसरा डाव 91 धावात गुंडाळला होता. तर भारताने फलंदाजी करताना 400 धावांचा डोंगर उभारून कांगारूंच्या नाकात दम केला होता.

भारतीय फलंदाजांनी कांगारूंची फिरकी निष्प्रभ केली होती. कांगारूंकडून टॉड मर्फीनेच चांगला मारा केला होता. त्याने भारताचे 7 फलंदाज गारद केले. त्यामुळे भारतीय संघ आता दुसऱ्या कसोटीसाठी कांगारूंच्या फिरकीचा अजून चांगला सामना करण्यासाठी कसून सराव करत आहे. मात्र फिरकीवर सराव करणाऱ्या भारताला कांगारूं एक मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहेत.

ऑस्ट्रेलियाचा धाकड वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्क नुकताच भारतात दाखल झाला आहे. हा डावखुरा वेगवान गोलंदाज पहिल्या कसोटीला दुखापतीमुळे मुकला होता. आता तो दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी भारतात दाखल झाला असून तो दुसरी कसोटी खेळू देखील शकतो.

स्टार्कच्या बोटाला दुखापत झाली होती. त्यामुळे तो पहिल्या कसोटीला मुकला होता. तो संघासोबत भारतात देखील आला नव्हता. मात्र दुखापतीतून सावरलेला स्टार्क शनिवारी भारतात दाखल झाला आहे. त्यानंतर त्याने दिल्ली कसोटीतील आपल्या समावेशाबाबत मोठे विधान केले.

तो म्हणाला की, 'मला अजून काही सुधारणा करण्याची गरज आहे. मात्र मी योग्य दिशेने पुढे जात आहे. अजून थोडी परिस्थिती सुधारणे गरजेचे आहे.' स्टार्क पुढे म्हणाला की, 'मी दुखापतीतून सावरत आहे. मात्र मला ज्या गतीने अपेक्षा होती तितक्या गतीने नाही. निवडीसाठी उपलब्ध राहण्यासाठी जे आवश्यक आहे ते करणार आहे. बाकी निर्णय हा संघ व्यवस्थापनावर अवलंबून आहे.'

ऑस्ट्रेलियाला पहिल्या कसोटीपूर्वी दुखापतीचा फटका बसला. स्टार्कबरोबरच कॅमेरून ग्रीन देखील दुखापतग्रस्त झाला होता. या दोघांनी बुधवारी गोलंदाजीचा सराव केला. ग्रीनने एक तास फलंदाजी देखील केली. स्टार्क आणि ग्रीन यांना संघात घ्यायचे की नाही याचा निर्णय आज गुरूवारी होईल.

(Sports Latest News)

हेही वाचा : वर्क फ्राॅम होम ते 'कायमचे घरी बसा?' हा प्रवास नक्की काय सांगतोय...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नाशिकमध्ये खळबळ! आश्रम शाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनीने दिला बाळाला जन्म, सुरक्षेवर पुन्हा प्रश्नचिन्ह, पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल

Tamil Nadu Reservation Case : मुख्यमंत्री विजय इस्लाम स्वीकारणाऱ्यांसाठी आरक्षण देण्याच्या बाजूने, तामिळनाडू सरकारची सुप्रीम कोर्टात धाव

Latest Marathi News Live Update : मोशीतील दुर्घटनाग्रस्त इमारतीत बचावकार्य अद्यापही सुरुच

FDA Raid on Dairy : FDA चा मोठा दणका! 1 लाख 32 हजारांचे दूध जागेवरच नष्ट; दुधात मिसळली जात होती हानिकारक पावडर, मराठवाड्यासह गुजरातला केला जात होता पुरवठा

Gold Rate Today: सोनं 5 हजारांनी महागलं! सलग दुसऱ्या दिवशी मोठी वाढ; मुंबई-पुण्यात 22 कॅरेट आणि 18 कॅरेटचा भाव किती?

SCROLL FOR NEXT