IND vs AUS Test Series  esakal
क्रीडा

IND vs AUS Test Series : भारताला भारतात पराभूत करण्याचा 'हा' आहे फॉर्म्यूला; माजी कोचचा खास सल्ला

अनिरुद्ध संकपाळ

IND vs AUS Test Series : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 4 कसोटी सामन्यांची मालिका फेब्रुवारी महिन्यात सुरू होत आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिका म्हटलं की त्याची खूप चर्चा होता. भारताने ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड यांना त्याच्या मायदेशात मात दिली आहे. मात्र भारताला भारतात मात देणे तितकेसे सोपे नाही.

ऑस्ट्रेलिया भारतीय दौऱ्यावर येताना स्पिनर्सची मोठा ताफा घेऊन येत आहे. यामुळे भारताला भारतात हरवण्याची त्यांची आशा पल्लवित झाली आहे. ऑस्ट्रेलियाचे माजी खेळाडू आणि कोच डॅरेन लेहमन यांनी भारताला भारतात हरवण्यासाठी काही खास टिप्स दिल्या आहेत.

लेहमन क्रिकेट ऑस्ट्रेलियाला सल्ला देतात की, 'ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघात एश्टन एगरला नक्की समाविष्ट करा कारण एगर, मिचेल स्वेपसन आणि पहिल्यांदाच खेळणारा टॉड मर्फी हे स्पिनर भारतीय खेळपट्ट्यांवर चांगली कामगिरी करू शकतात. नॅथन लिओन आणि एगर ही जोडी भारतात धुमाकूळ घालू शकते.'

नुकत्याच दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या कसोटी सामन्यात एगरला फारसे यश मिळाले नव्हते. मात्र लेहमन यांना वाटते की तो भारतात चांगली कामगिरी करू शकतो. लेहमनने ऑस्ट्रेलियाच्या रेडिओ स्टेशन SENQ वर आपले हे वक्तव्य केले. ते म्हणाले की मी तेथे (भारतात) बराचकाळ होतो. मला वाटते की एगर तेथे चांगली कामगिरी करू शकतो. मला असे वाटते की फिंगर स्पिनरला भारतात चांगली संधी मिळायला हवी.

(Sports Latest News)

हेही वाचा : प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL 1st Test: गौतम गंभीरने खेळपट्टीची पाहणी केली, पाठ वळताच क्युरेटरने 'खेळी' खेळली; कॅप्टन, कोचने एकवटले... माईंड गेम

शूटिंगदरम्यान ज्युनिअर एनटीआरला झालेली गंभीर दुखापत; खांद्यावर झाली शस्त्रक्रिया, आता 2 ते 3 महिन्यांचा घेणार ब्रेक

IND vs SL: शुभमन गिल-रिषभ पंत श्रीलंकेत धुमाकूळ घालणार? WTC मध्ये आजपर्यंत कोणालाही न जमलेला पराक्रम करण्याची संधी

Latest Marathi News Live Update : तुम्ही मला अस्पृश्यासारखी वागणूक देता, 'शुद्धीकरण' करता आणि माझा अपमान करता."- खर्गे राज्यसभेत संतापले

‘Gift a Life After Life’! अवयवदानासाठी ५०० विद्यार्थ्यांचा पुढाकार; ‘Tree Of Life’मधून दिला जीवनाचा संदेश

SCROLL FOR NEXT