Australia Matthew Wade Trolled For Bad Example Of Sportsmanship  esakal
क्रीडा

VIDEO : ऑस्ट्रेलियाचा रडीचा डाव; खिलाडूवृत्तीबाबत 'लोका सांगे ब्रम्हज्ञान स्वतः कोरडे पाषाण'

अनिरुद्ध संकपाळ

Australia Vs England T20I Matthew Wade : इंग्लंड सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन टी 20 सामन्यांची मालिका खेळली जात आहे. दरम्यान, पहिल्या सामन्यात इंग्लंडने ऑस्ट्रेलियाचा 8 धावांनी पराभव केला. मात्र या सामन्यावेळी यजमान ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू वेडने अखिलाडूवृत्तीचे दर्शन घडवले. यावरून आता ऑस्ट्रेलिया आणि मॅथ्यू वेडला चांगलेच ट्रोल केले जात आहे.

हे संपूर्ण प्रकरण दुसऱ्या डावातील 17 व्या षटकात घडले. इंग्लंडने ऑस्ट्रेलियासमोर 209 धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र कांगारूंची सुरूवात फारशी चांगली झाली नाही. ऑस्ट्रेलियाकडून एकडा डेव्हिड वॉर्नर लढला. त्यानंतर मिचेल मार्श आणि मार्कस स्टॉयनिस यांनी सामन्यातील ऑस्ट्रेलियाचे आव्हान जिवंत ठेवले होते.

ऑस्ट्रेलियाला सेवटच्या 4 षटकात 40 धावांची गरज होती. 17 व्या षटकात डेव्हिड वॉर्नर स्ट्राईकवर होता. त्याने पहिल्या चेंडूवर एक धाव घेत स्ट्राईक मॅथ्यू वेडकडे दिले. मात्र पुढचा चेंडू वेडने निर्धाव घालवला. दरम्यान, वूडचा एका शॉर्ट बॉलवर वेड बावचळला. चेंडू त्याच्या बॅटला लागून वर उडाला. हा कॅच पकडण्यासाठी वूड बॅटिंग एन्डच्या क्रीजकडे धावत होता. मात्र त्याचवेळी मॅथ्यू वेडने हाताने त्याला आडवत धावबाद होण्यापासून वाचण्यासाठी डाईव्ह मारला. वूडची अडवणूक झाल्याने त्याला झेल घेता आला नाही. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

याच षटकात डेव्हिड वॉर्नर बाद झाला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाला शेवटच्या षटकात 16 धावांची गरज असताना वेड 15 चेंडूत 21 धावा करून बाद झाला. ऑस्ट्रेलिया 20 षटकात 9 बाद 200 धावाच करू शकली. इंग्लंडने सामना 8 धावांनी जिंकला. मार्क वूडने भेदक मारा करत 4 षटकात 34 धावा देत 3 विकेट घेतल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विरोधी पक्षनेतेपदासाठी महाविकास आघाडीचं सरन्यायाधीशांना साकडं; पत्र देऊन व्यक्त केली नाराजी...

Thane Politics: भाजपचे विकास म्हात्रेंचा युटर्न! वरिष्ठांनी मनधरणी करताच गैरसमज दूर

Latest Maharashtra News Updates : मराठी पत्रांना मराठीतच उत्तर देण्याचा केंद्राचा निर्णय

Indian Railway: गणेशोत्सवाचे आरक्षण टप्प्याटप्प्याने सुरू करा, रेल्वेकडे प्रवासी संघटनांची मागणी

Pali News : पतीदेव झाले कारभारी! पाच्छापूर सरपंचांच्या पतीचा ग्रामपंचायत कारभारात हस्तक्षेप, आर्थिक लाभही घेतले

SCROLL FOR NEXT