Australia Men Cricket Team Coach Justin Langer Surprise Resignation  esakal
क्रीडा

इंग्लंड पाठोपाठ ऑस्ट्रेलियातही राजीनाम्याचा संसर्ग; लँगरनी सोडले पद

अनिरुद्ध संकपाळ

ऑस्ट्रेलिया संघाचे मुख्य प्रशिक्षक जस्टीन लँगर (Justin Langer) यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत सर्वांनाच धक्का दिला. विशेष म्हणजे त्यांच्या कार्यकाळात ऑस्ट्रेलियाने अ‍ॅशेस मालिकेत (Ashes Series) इंग्लंडचा 4-0 असा पराभव केला. याचबरोबर ऑस्ट्रेलियाने टी 20 वर्ल्डकप देखील जिंकला. जस्टीन लँगर आणि क्रिकेट ऑस्ट्रेलिया (Cricket Australia) यांच्यात त्यांचा करार वाढवून देण्याबाबत दीर्घ चर्चा सुरू होती. मात्र लँगर यांनी अचानक राजीनाम्याचा बॉम्ब टाकला. (Australia Men Cricket Team Coach Justin Langer Surprise Resignation)

स्पोर्ट्स मॅनेजमेंट कंपनी डीएसईजी (DSEG)DSEG यांनी जस्टीन लँगर यांच्या राजीनाम्याबाबत 'जस्टीन लँगर यांनी आज सकाळी ऑस्ट्रेलिया पुरूष क्रिकेट संघाच्या प्रशिक्षक पदाचा राजीनामा दिला आहे.' असे वक्तव्य प्रसिद्ध केले.

जस्टीन लँगरला क्रिकेट ऑस्ट्रेलियाने त्यांच्या पदासाठी पुन्हा अर्ज करण्यास सांगितले होते. तसेच त्यांना छोट्या कालावधीसाठी करारबद्ध करण्यात येणार होते. याचा लँगर यांना राग आल्याची चर्चा सुरू आहे. ऑस्ट्रेलियाने अ‍ॅशेस मालिका 4-0 अशी जिंकल्यानंतर ती जागतिक कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर पोहचली आहे.

दरम्यान, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने जस्टीन लँगर यांच्या राजीनाम्यावर आपली प्रतिक्रिया दिली. 'जस्टीन यांना त्यांच्या सध्याच्या करारात छोटी मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. मात्र त्यांना तो मान्य न करण्याचा निर्यण घेतला.' लँगर यांच्या राजीनाम्यानंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने अँड्र्यु मॅकडोनाल्ड यांची हंगामी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Exam Latest Update : ...अखेर राज्यसेवा 2025 च्या मुलाखती ढकलल्या पुढे; नवी तारीख काय? मुख्य परीक्षेबाबत अद्यापही अस्पष्टता!

Rekha Gupta Organ Donation : पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी रेखा गुप्तांचा मरणोत्तर अवयवदानाचा संकल्प; नागरिकांनाही आवाहन

आमचे मार्ग आता जुळत नाहीत! Prithvi Shaw अन् आकृती अगरवाल यांचा वेगळा होण्याचा निर्णय; क्रिकेटपटूच्या पोस्टची चर्चा...

लग्नानंतर स्वयंपाक शिकली मेघना एरंडे; म्हणाली- माहेरची आणि सासरची लोकं गणेशोत्सवात आमच्या घरी येतात आणि...

Latest Marathi News Update : NTA कडून वर्षभरातील परीक्षांचे तात्पुरते वेळापत्रक जाहीर

SCROLL FOR NEXT