Australia Open 2023 Sakal
क्रीडा

Australia Open 2023 : सानिया मिर्झा अन् रोहन बोपण्णाने गाठली मिश्र दुहेरीची अंतिम फेरी

सानियाचे हे शेवटचे ग्रँडस्लॅम असल्याने अंतिम फेरी गाठणे सानियासाठी खूप महत्त्वाचे मानले जात आहे.

सकाळ डिजिटल टीम

Australia Open 2023 : भारताची सानिया मिर्झा आणि रोहन बोपण्णाने ऑस्ट्रेलियन ओपनच्या मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत गाठली आहे.

हेही वाचा - 'नाटू नाटू..'ला मिळाला पुरस्कार..पण पुढे काय?

भारतीय जोडीने उपांत्य फेरीत ग्रेट ब्रिटनच्या नील स्कुप्स्की आणि यूएसएच्या डेसिरिया क्रॉझिक यांचा ७-६, ६-७ (१०-६) असा पराभव केला. तत्पूर्वी, भारतीय जोडीला उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत जेलेना ओस्टापेन्को आणि डेव्हिड वेगा हर्नांडेझ या लॅटव्हियन आणि स्पॅनिश जोडीविरुद्ध वॉकओव्हर मिळाला होता.

सानियाची ही शेवटचे ग्रँडस्लॅम असल्याचे तिने या आधी स्पष्ट केले आहे. त्यामुळे अंतिम फेरी गाठणे सानियासाठी खूप महत्त्वाचे मानले जात आहे. अंतिम फेरीसाठी पात्र ठरल्यानंतर अव्वल भारतीय टेनिस स्टार आणखी एका ग्रँडस्लॅम विजेतेपदाचे स्वप्न पाहणार आहे.

सानिया मिर्झाने आतापर्यंत 3 मिश्र दुहेरी आणि 3 महिला दुहेरीसह एकूण 6 ग्रँडस्लॅम जिंकले आहेत. तिने 2015 मध्ये विम्बल्डन आणि यूएस ओपन आणि 2016 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन महिला दुहेरीमध्ये जिंकले. याआधी तो 2011 मध्ये फ्रेंच ओपनचा अंतिम सामना खेळला होता. त्याचवेळी 2009 मध्ये विम्बल्डन, 2012 मध्ये फ्रेंच ओपन आणि 2014 मध्ये मिश्र दुहेरीत यूएस ओपन जिंकले. सानिया मिर्झा आणि महेश भूपतीने 2009 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन मिश्र दुहेरीचे विजेतेपद पटकावले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI Transaction Charges: 2000 रुपयांपेक्षा अधिकच्या यूपीआय व्यवहारांवर 0.4 टक्के टॅक्स; 'या' ग्राहकांसाठी मात्र UPI सेवा मोफत

''तर तोंड काळं करायची वेळी आली असती'', राज ठाकरेंच्या 'त्या' टीकेला CM फडणवीसांनी दिलं प्रत्युत्तर...

IND vs AFG 2nd T20I: 'Toss' चा 'BOSS'! श्रेयस अय्यरने नोंदवला वर्ल्ड रेकॉर्ड; वरूण चक्रवर्तीला नेमकं काय झालं? BCCI म्हणते...

Pune News : पुण्याच्या चारीही दिशांना स्वतंत्र डंबर प्लांट उभारा; महापौर नागपुरे यांचे आयुक्तांना पत्र

Hingoli News : चोंडीत शक्तिपीठ महामार्गाची मोजणी रोखली! ‘जमीन गेली तर जगायचे कसे?’ वृद्ध महिला शेतकऱ्यांचा आक्रोश; तुषार जाधव यांचा पालकमंत्र्यांना थेट इशारा

SCROLL FOR NEXT