Australia PM Scott Morrison turns commentator during Ashes  Sakal
क्रीडा

PM Scott Morrison यांची 'बोलंदाजी, ईशा-गिलख्रिस्टला सरप्राईज

सुशांत जाधव

Australia PM Scott Morrison turns commentator during Ashes : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना सिडनीच्या मैदानात सुरु आहे. पहिल्या तीन सामन्यातील विजयासह ऑस्ट्रेलियन संघाने अ‍ॅशेस मालिका आधीच जिंकलीये. चौथ्या सामन्यातही त्यांनी मजबूत पकड बनवली आहे. या सामन्यादरम्यान एक कमालीचा क्षण क्रिकेट चाहत्यांना अनुभवायला मिळाला.

ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन (Australia PM Scott Morrison ) यांनी थेट कॉमेंट्री बॉक्समध्ये हजेरी लावली. सामन्याच्या तिसऱ्या दिवशीच्या खेळात पंतप्रधान मॉरिसन समालोचक अ‍ॅडम गिलख्रिस्ट (Adam Gilchrist) आणि ईशा गुहा (Isa Guha) यांच्यामध्ये बसून कॉमेंट्री करताना दिसते. कॉमेंट्री करतानाचा त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

सिडनीच्या मैदानातील तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू असताना स्कॉट मॉरिसन समालोचन कक्षात आल्याचे पाहायला मिळाले. काही वेळ त्यांनी ऑस्ट्रेलियाचा माजी यष्टीरक्षक अ‍ॅडम गिलख्रिस्ट आणि समालोचक ईशा गुहा यांच्याशी गप्पा गोष्टी केल्या. त्यानंतर त्यांनी माईक आणि हेडफोन्स लावून थेट समालोचकाची भूमिका बजावली. देशाच्या पंतप्रधानांचा हा अंदाज सर्वांनाच आवाक करुन सोडणारा होता.

सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर रंगलेला सामना 'पिंक टेस्ट' म्हणून ओळखला जातो. हा सामना नेहमीच्या लाल चेंडूवरच खेळवला जातो. मात्र सर्व स्टेडियमवर गुलाबी वातावरण पाहायला मिळते. स्तनाच्या कर्करोगासंदर्भात जागरूकतीचा खास संदेश या कसोटी सामन्यातून दिला जातो. कसोटीतून मॅकग्रा फाऊंडेशनला आर्थिक सहाय्य केले जाते. मॉरिसन यांनी देखील फाऊंडेशनसाठी 40 मिलियन डॉलर्सचे अनुदान मंजूर केलं. ऑस्ट्रेलियन सरकार मॅकग्रा फाऊंडेशनच्या सत्कार्याला नेहमीच पाठिंबा देईल, असं आश्वासनही मॉरिसन यांनी यावेळी दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maya Kulkarni Death : कोल्हापूर महापालिकेच्या निवृत्त अधिकाऱ्याचा गाव तलावात आढळला मृतदेह; मृत्यूचं कारण अद्याप अस्पष्ट

Pune Fire Safety: पुण्यात अग्निसुरक्षेचा बडगा; नियमभंग करणाऱ्या ४४७ आस्थापनांना नोटिसा, आठ दिवसांत यंत्रणा उभारण्याचे आदेश

Gokul Election Seat Sharing Formula : गोकुळ निवडणुकीत मोठा ट्विस्ट! जागावाटपावरून महायुतीत धुसफुस; मंत्री मुश्रीफ नाराज? फॉर्म्युला ठरला, पण घोषणा लांबणीवर

Latest Marathi News Live Update : निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात ठाकरे बंधूंचा ‘गर्जना मोर्चा’; पालघरमधून मनसैनिक-शिवसैनिक मुंबईत दाखल

पूर्णेकर हत्याकांडात नवे धागेदोरे! गोळीबार करणारा पवार; संशयित 'लावण्य' तरुणीचीही ‘एसआयटी’कडून चौकशी

SCROLL FOR NEXT