Shane Warne esakal
क्रीडा

ऑस्ट्रेलियाच्या महान गोलंदाजाने निवडले टॉप 5 कसोटी फलंदाज

सकाळ डिजिटल टीम

महान फिरकी गोलंदाज शेन वॉर्ननं कसोटी क्रिकेटमधील आपल्या पाच आवडत्या कसोटी फलंदाजांची निवड केलीय.

जगातील महान फिरकी गोलंदाज शेन वॉर्ननं (Shane Warne) सध्या कसोटी क्रिकेटमधील (Test Cricket) आपल्या पाच आवडत्या कसोटी फलंदाजांची निवड केलीय. शेन वॉर्नच्या या यादीत भारताचा कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहलीलाही (Virat Kohli) स्थान मिळालंय. या यादीत ऑस्ट्रेलियाचे 2 फलंदाज आहेत. याशिवाय, वॉर्ननं इंग्लंड, न्यूझीलंड आणि भारतातून प्रत्येकी एक खेळाडू निवडलाय. वॉर्ननं आपल्या यादीत ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथला (Steve Smith) देखील स्थान दिलंय. स्मिथच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये 7000 हून अधिक धावा आहेत.

वॉर्ननं इंग्लंडचा कसोटी कर्णधार आणि फलंदाज जो रूटला दुसऱ्या क्रमांकावर ठेवलंय. यादरम्यान त्यानं 6 शतकं झळकवली आहेत. या वर्षी भारताविरुद्धच्या मालिकेत त्यानं सलग तीन शतकं झळकावली होती. वॉर्ननं न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनला (Ken Williamson) तिसऱ्या क्रमांकावर ठेवलंय, तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात यशस्वी फलंदाजांपैकी एक आहे. त्याच्या नेतृत्वाखाली किवी संघानं जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचं पहिलं विजेतेपद पटकावलंय.

शेन वॉर्ननं विराट कोहलीला चौथ्या क्रमांकावर ठेवलंय. मात्र, सध्या विराटची कामगिरी खूपच खराब असल्याचं वॉर्ननंही मान्य केलंय, पण तरीही विराटला त्यानं टॉप 5 मध्ये स्थान दिलंय, तर माजी फिरकीपटूनं मार्नस लाबुशेनलाही पहिल्या 5 मध्ये स्थान दिलंय. लाबुशेन आक्रमक खेळू शकतो, तसेच बराच वेळ क्रीजवर राहू शकतो. त्यानं 19 कसोटीत जवळपास 2000 धावा केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'पोलिसात न्या, तिथं बघतोच तुम्हाला, माझा बाप...' मनसे नेत्याच्या लेकाची इन्फ्लुएन्सरला शिवीगाळ, अर्धनग्नावस्थेतला VIDEO VIRAL

Pune News: शिक्षकांचे आंदोलन सुरू, पण विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही,शाळा ८, ९ जुलैला बंद राहणार नाहीत, शिक्षण विभाग

Sangli Muharram: 'हिंदू-मुस्लिम ऐक्याची दीडशे वर्षांची परंपरा'; गगनचुंबी ताबुतांच्या कडेगावात गळाभेटी

Viral Video: अप्पाचा विषय लय हार्डय ! जीम ट्रेनर समोर आजोबांनी मारले जोर पण टोपी पडली नाही... पाहा अनोख्या कौशल्याचा व्हिडिओ

'ही प्राडाची नाही... ओरिजनल कोल्हापुरी आहे'; Prada ला टोला लगावत अभिनेत्री करिना कपूर 'कोल्हापुरी चप्पल'बाबत काय म्हणाली?

SCROLL FOR NEXT