Australia Vs South Africa Boxing Day Test Anrich Nortje esakal
क्रीडा

AUS vs RSA VIDEO : स्पायडर कॅमने वेगवान गोलंदाजाला मारली जोरदार धडक; नशीब बलवत्तर म्हणून...

अनिरुद्ध संकपाळ

Australia Vs South Africa Boxing Day Test Anrich Nortje : ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील बॉक्सिंग डे कसोटीच्या दुसऱ्या दिवशी डेविड वॉर्नरने आपल्या 100 व्या कसोटीत ऐतिहासिक द्विशतकी खेळी केली. मात्र यात कसोटीत दुखापती आणि अपघातांचा सिलसिला देखील पहायला मिळाला. वॉर्नर क्रॅम्प येऊ लागल्याने 200 धावांवर रिटायर्ड हर्ट झाला. तर स्टार्कच्या बोटातून रक्त येऊ लागल्याने तो देखील पॅव्हेलियनमध्ये परतला. याच्यावर कहर म्हणजे दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज नॉर्त्जेच्या डोक्याला थेट स्पायडर कमॅच धडकला.

ऑस्ट्रेलिया आपला पहिला डाव खेळत असताना नॉर्त्जे स्क्वेअर लेगला फिल्डिंग करत होता. त्याचवेळी फॉक्स क्रिकेट ब्रॉडकास्टर्सचा स्पॉयडर कॅम काही क्षणचित्रे टिपत होता. यादरम्यान, स्पायडर कॅम आणि नॉर्त्जेची जोरदार टक्कर झाली. यामुळे नॉर्त्जे जमिनीवर खाली पडला. धडक जोराची होती. त्यामुळे सर्वांनाच धास्ती वाटत होती. मात्र नॉर्त्जे थोड्या वेळाने उभा राहिला अन् सर्वांचा जीव भांड्यात पडला.

बॉक्सिंग डेबद्दल सांगायचे झाले तर यजमान ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या दिवशाचा खेळ संपला त्यावेळी 3 बाद 386 धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेवर 197 धावांची आघाडी घेतली आहे. आपला शंभरावा कसोटी सामना खेळणाऱ्या डेव्हिड वॉर्नरने 200 धावा केल्या. दिवसाचा खेळ संपला त्यावेळी ट्रॅव्हिस हेड 48 तर अॅलेक्स कॅरी 9 धावा करून नाबाद होते. (Sports Latest News)

गोलंदाजीत नॉर्त्जेने वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथची द्विशतकी भागीदारी तोडली. स्मिथ 85 धावा करून बाद झाला. नॉर्त्जेबरोबरच कसिगो रबाडाने देखील एक विकेट घेतली.

हेही वाचा : जोखीममुक्त व्यवहारांसाठी रिझर्व बँकेचा 'डिजिटल रुपया'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुनर्वसनावरून केडीएमसी महासभेत खडाजंगी! "आमदारांसाठी एक आणि नगरसेवकांसाठी दुसरा नियम आहे का?" भाजप नगरसेवकांचा सवाल

Mumbai News: मुंबईत मीडिया हब उभारणार, डिजिटल कंटेंट क्षेत्राला नवी दिशा मिळणार; आशीष शेलार यांची घोषणा

Latest Marathi News Live Update : शिवसेना अधिक बळकट होणार असल्याचा दीपक केसरकर यांचा दावा

Mumbai News: बोरिवलीच्या धर्तीवर कांदिवली रेल्वे स्थानकाचा विकास, गाड्यांची क्षमता वाढणार

Fact Check : सौरव गांगुलीला ED ची नोटीस अन् घरावर छापे? भारताचा माजी कर्णधार संतापला; थेट पोलिसात तक्रार, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT