T20 WC INDW vs AUSW
T20 WC INDW vs AUSW  esakal
क्रीडा

IND vs AUS T20 WC : 23 चेंडूत ठोकल्या 98 धावा! ऑस्ट्रेलियाच्या टॉप ऑर्डरने भारताची केली धुलाई

अनिरुद्ध संकपाळ

T20 WC INDW vs AUSW : ऑस्ट्रेलियाने महिला टी 20 वर्ल्डकपच्या सेमी फायनल सामन्यात प्रथम फलंदाजी करत भारतासमोर 173 धावांचे तगडे आव्हान ठेवले. ऑस्ट्रेलियाकडून बेथ मूनीने 54 धावांची अर्धशतकी तर कर्णधार मेघ लेनिंगने नाबाद 49 धावांची दमदार खेळी केली. याचबरोबर अॅश्लेघ गार्डनेर 18 चेंडूत 31 धावा चोपल्या. ऑस्ट्रेलियाने 20 षटकात तब्बल 20 चौकार आणि 3 षटकार मारले. त्यांनी 23 चेंडूत 98 धावा ठोकल्या. भारताकडून शिखा पांडेने 2 विकेट्स घेतल्या.

महिला टी 20 वर्ल्डकपच्या सेमी फायनल सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर बेथ मूनी आणि एलिसा हेली यांनी दमदार सुरूवात करत 52 धावांची सलामी दिली. बेथ मूनी आक्रमक फलंदाजी करत होती. तर हेलेने बॉल टू रन धावा केल्या.

मात्र ही जोडी राधा यादवने फोडली. तिने हेलेला 25 धावांवर बाद केले. यानंतर बेथ मूनीने डावाची सूत्रे आपल्या हातात घेत अर्धशतक झळकावले. अखेर तिची ही अर्धशतकी खेळी शिखा पांडेने 54 धावांवर संपवली. मात्र तोपर्यंत ऑस्ट्रेलियाने 88 धावांपर्यंत मजल मारली.

मूनी बाद झाल्यानंतर कर्णधार मेघ लेनिंग आणि अॅश्लेघ गार्डनेरने 14 व्या षटकात ऑस्ट्रेलियाला शतक पार करून दिले. लेनिंग आणि गार्डनेरने शेवटच्या 5 षटकात ऑस्ट्रेलियाची धावगती वाढवण्यास सुरूवात केली. गार्डनेरने आक्रमक फटकेबाजी करत जवळपास 200 च्या स्ट्राईक रेटने धावा चोपल्या. गार्डनेरने 18 चेंडूत 31 धावा ठोकल्या.

यानंतर दिप्ती शर्मा आणि शिखा पांडेने पाठोपाठ विकेट्स घेत सामन्यात पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. मात्र कर्णधार मेघ लेनिंगने 34 चेंडूत 49 धावा ठोकत ऑस्ट्रेलियाला 20 षटकात 4 बाद 172 धावांपर्यंत पोहचवले. भारतासमोर विजयासाठी 173 धावांचे मोठे आव्हान ठेवले.

(Sports Latest News)

हेही वाचा : का वाढतात रिअल इस्टेटचे भाव?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आता मसाल्यातही भेसळीची फोडणी! लाकडाचा भुसा, Acid चा वापर; १५ टन बनावट मसाला जप्त

Aavesham: 30 कोटींचं बजेट अन् कमाई 140 कोटी; ब्लॉकबस्टर ठरला फहाद फासिलचा आवेशम, ओटीटीवर कधी होणार रिलीज?

Karan Johar : "आई सोबत टीव्ही पाहत होतो पण.. " करण जोहर भडकला, कॉमेडीयनने मागितली माफी; कोण आहे केतन सिंह ?

Gadchiroli: स्फोटकांनी भरलेले 6 प्रेशर कुकर अन् डिटोनेटर नष्ट...मातीच्या खाणींचा शोध घेण्यासाठी गेलेल्या जवानांची कारवाई

Sunil Gavaskar Video : गावसकरांचा जुना VIDEO व्हायरल, रनरेटवरून विराटवर टीका केल्यानंतर झाले ट्रोल

SCROLL FOR NEXT