INDW vs AUSW 3rd T20 Shafali Verma esakal
क्रीडा

INDW vs AUSW : 6, 6, 6 शफाली वर्माची धडाकेबाज खेळी मात्र कांगारूंनी केला भारताचा पराभव

अनिरुद्ध संकपाळ

INDW vs AUSW 3rd T20 : ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाने तिसऱ्या टी 20 सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाचा 21 धावांनी पराभव केला. भारताला ऑस्ट्रेलियाच्या प्रत्युत्तरात 20 षटकात 7 बाद 151 धावांपर्यंतच मजल मारता आली. दिप्ती शर्माने 16 चेंडू 24 धावा चोपून शेवटपर्यंत झुंज देण्याचा प्रयत्न केला. मात्र ऑस्ट्रेलियाने शेवटच्या षटकात 27 धावांची गरज असताना भारताला फक्त 6 धावाच करता आल्या. भारताकडून सलामीवीर शफाली वर्माने सर्वाधिक 52 धावा केल्या. तिने आपल्या खेळीत 3 षटकार आणि 6 चौकार मारले. इंग्लंडकडून ब्राऊन आणि गार्डनरने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

ऑस्ट्रेलियाने ठेवलेल्या 173 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताला तिसऱ्या षटकात पहिला धक्का बसला सलामीवीर स्मृती मानधना 10 चेंडूत अवघी 1 धाव करून बाद झाली. दरम्यान दुसरी सलामीवीर शफाली वर्माने पॉवर प्लेचा फायदा उचलत झापाट्याने धावा करण्यास सुरूवात केली होती. मात्र दुसऱ्या बाजूने जेमिमाह रॉड्रिग्ज 11 चेंडूत 16 धावांची भर घालून परतली.

यानंतर शेफाली वर्मा आणि कर्णधार हरमनप्रीत कौर यांनी तिसऱ्या विकेटसाठी 73 धावांची भागीदारी रचली. शफाली वर्माने 41 चेंडूत 52 धावा चोपल्या. या दोघींनी भारताला 14 व्या षटकात शंभरी पार करून दिली होती. मात्र शफाली वर्मा 52 धावांवर बाद झाली. यानंतर देविका वैद्य आणि रिचा घोष या देखील प्रत्येकी 1 धावेची भर घालून परतल्या. दरम्यान, कर्णधार हरमनप्रीतने आपला गिअर बदलला होता.

तिने सामना 30 चेंडूत 60 धावा असा आणला. मात्र स्कॉटने तिला 37 धावांवर बाद करत भारताला सहावा आणि मोठा धक्का दिला. या धक्यातून भारत शेवटपर्यंत सावरला नाही. दिप्ती शर्माने 24 धावांची झुंजार खेळी करत शेवटपर्यंत लढत दिली. मात्र भारताला 151 धावांपर्यंतच मजल मारता आली.

भारतीय महिला क्रिकेट संघ आणि ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघ यांच्यातील तिसऱ्या वनडे सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाने भारतासमोर 20 षटकात विजयासाठी 173 धावांचे आव्हान ठेवले. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करणाऱ्या भारताने पॉवर प्लेमध्ये चांगली सुरूवात केली. मात्र ऑस्ट्रेलियाची अनुभवी फलंदाज एलिस पेरीने 47 चेंडूत 75 धावांची झुंजार खेळी केली. तिला बेथ मूनीने 30 तर ग्रेस हॅरिसने 47 धावा करून चांगली साथ दिली. भारताकडून रेणुका सिंह, देविका वैद्य आणि दिप्ती शर्मा यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

हेही वाचा : संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT