Western Australia won the 2021/22 Sheffield Shield : भारतीय संघातील प्रमुख गोंलदाज जसप्रित बुमराहची (jasprit bumrah) गोलंदाजी शैली नेहमीच चर्चेचा विषय राहिली आहे. क्रिकेटच्या मैदानात कोणी ना कोणी त्याच्या शैलीची कॉपी करताना दिसते. भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीही मैदानात त्याची नक्कल करताना पाहायला मिळाले होते. त्यानंतर आता ऑस्ट्रेलियन गोलंदाजाने बुमराहची गोलंदाजी शैली (Jasprit Bumrah Bowling Action) कॉपी केल्याचे पाहायला मिळाले. ऑस्ट्रेलियातील शेफील्ड शील्डच्या फायनलमध्ये (Sheffield Shield Final 2022) ऑस्ट्रेलियन गोलंदाज बुमराहच्या शैलीत गोलंदाजी करताना दिसले.
ऑस्ट्रेलियन गोलंदाज निक मॅडिन्सन (Nic Maddinson) याने वेस्टर्न ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात बुमराहच्या शैलीत गोलंदाजी केली. यावेळी हारून हार्डी आणि मॅथ्यू केली बॅटिंग करत होते. विक्टोरियाचा गोलंदाज मॅडिन्सन याने हार्डीला बुमराहच्या तोऱ्यात गोलंदाजी केली.
वेस्टर्न ऑस्ट्रेलियातील दुसऱ्या डावातील 161 व्या षटकात मॅडिन्सनने पहिलाच चेंडू बुमराहच्या शैलीत टाकला. निर्धाव चेंडूवर बॅटरने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. पण त्याच्या संघातील खेळाडूंना हसू आवरता आले नाही. विक्टोरियाचे क्षेत्ररक्षक आणि विकेट किपर त्याचा हा अंदाज पाहून हसताना दिसले. शेफील्ड शील्डच्या फायनलमध्ये वेस्टर्न ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 386 धावा केल्या होत्या. विक्टोरिया संघ पहिल्या डावात 306 धावांत आटोपला. दुसऱ्या डावात वेस्टर्न ऑस्ट्रेलियाने 400/7 धावांवर डाव घोषीत केला. दोन्ही संघातील हा सामना अनिर्णित राहिला. मॅडिन्सन याने बुमराहच्या शैलीत गोलंदाजी करत चांगलीच प्रसिद्धी मिळवली. सोशल मीडियावर त्याचा व्हिडिओ व्हायरल होत असून त्याला उत्तम प्रतिसाद मिळताना दिसत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.