Shane Warne
Shane Warne 
क्रीडा

Shane Warne : ...म्हणून शेन वॉर्नची 'ती' ग्रीन टोपी कोटीत विकण्यात आली

Kiran Mahanavar

Shane Warne Birth Anniversary : ऑस्ट्रेलियाचा महान लेग-स्पिनर शेन वॉर्नचे वयाच्या 52 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. या वर्षी 20 मार्चला वॉर्नने जगाचा निरोप घेतला. शेन वॉर्न जगातील सर्वात दिग्गज खेळाडूंपैकी एक होता. वॉर्नने टेस्ट फॉरमॅटमध्ये 700 पेक्षा जास्त विकेट घेतल्या आहेत. त्याचबरोबर वनडे फॉरमॅटमध्ये 293 विकेट्स घेतल्या आहेत. वॉर्न त्याच्या कारकिर्दीत खूप लोकप्रिय होता. वॉर्नच्या लोकप्रियतेचा अंदाज यावरून लावता येतो की त्याची एक कॅप करोडो मध्ये विकल्या गेली.

ऑस्ट्रेलियाला 2022 च्या जानेवारी महिन्यात भीषण आगीच्या दुर्घटनेचा सामना करावा लागला होता. अशा परिस्थितीत वॉर्न आपल्या देशाच्या मदतीसाठी पुढे आला. पीडितांना मदत करण्यासाठी त्याने आपल्या ग्रीन कॅपचा लिलाव केला. वॉर्नची टोपी लिलावात सुमारे 5 कोटी रुपयांना विकली गेली. वॉर्नने लिलावाची संपूर्ण रक्कम आगग्रस्तांच्या मदतीसाठी दान केली. याआधी माजी महान खेळाडू डॉन ब्रॅडमन यांची कॅप 3 कोटी 6 लाख रुपयांना विकली गेली होती. जानेवारी 2003 मध्ये त्याचा लिलाव झाला होता.

वॉर्नने 145 कसोटी सामन्यात 708 विकेट घेतल्या आहेत. यादरम्यान त्याने 10 वेळा 10-10 विकेट घेतले आहे. वॉर्नने 194 वनडेत 293 विकेट्स घेतल्या. त्याची वनडे फॉरमॅटमधील सर्वोत्तम कामगिरी म्हणजे 33 धावांत 5 बळी आहे. देशांतर्गत सामन्यांमध्येही त्याने चांगली कामगिरी केली आहे. वॉर्नने लिस्ट ए मध्ये 473 विकेट घेतल्या आहेत. तर प्रथम श्रेणी सामन्यात 1319 विकेट्स घेतल्या आहेत. वॉर्न इंडियन प्रीमियर लीगमध्ये राजस्थान रॉयल्सचा महत्त्वाचा भाग होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Pawar: रोहित पवारांनी शेअर केलेल्या 'त्या' व्हिडिओनंतर PDCC बँकेच्या मॅनेजरसह बँकेवर गुन्हा दाखल

Bidkin Crime News : धक्कादायक! भीशीचे व व्याजाचे पैसे न दिल्याने महिलेसह पाच मुलांचे अपहरण

Yuzvendra Chahal: ऋषभ पंतची विकेट चहलसाठी ठरली ऐतिहासिक! T20 मध्ये कोणत्याच भारतीयाला न जमलेला केला पराक्रम

Lok Sabha Election 2024: देशभरात तिसऱ्या टप्प्यात 61 टक्के, महाराष्ट्रात 54.09 टक्के मतदान

IPL 2024 DC vs RR Live Score: दिल्लीचे राजस्थानसमोर 222 धावांचे लक्ष्य! फ्रेझर-मॅकगर्क, पोरेलचे अर्धशतक, तर स्टब्सची अखेरीस तुफानी फटकेबाजी

SCROLL FOR NEXT