क्रीडा

WTC Final Ind vs Aus: 'आम्ही भारताला WTC फायनलमध्ये नेलं...', ऑस्ट्रेलियन कर्णधारच्या वक्तव्याने उडाली खळबळ

लंडनमधील ओव्हल मैदानावर बॉल आणि बॅटच्या लढतीपूर्वीच शाब्दिक युद्ध झाले सुरू

Kiran Mahanavar

WTC Final Ind vs Aus : जागितक कसोटी चॅम्पियनशिपच्या दुसऱ्या आवृत्तीचा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सात जूनपासून खेळल्या जाणार आहे. लंडनमधील ओव्हल मैदानावर बॉल आणि बॅटच्या लढतीपूर्वीच शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे.

यामध्ये ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सचे असे विधान समोर आले जे कदाचित भारतीय चाहत्यांना आवडणार नाही. ऑस्ट्रेलियन मीडिया सिडनी मॉर्निंग हेराल्डशी बोलताना कमिन्स म्हणाले की, आम्ही भारताला डब्ल्यूटीसी फायनलमध्ये नेलं, बहुतेक हे लोक विसरले आहेत.

ऑस्ट्रेलियाने 19 पैकी 11 कसोटी सामने जिंकून या आवृत्तीत अव्वल स्थान पटकावले आहे. बॉर्डर गावसकर ट्रॉफी 2023 मध्ये भारताविरुद्ध त्याला एकमेव मालिका पराभवाचा सामना करावा लागला होता. ही मालिका जिंकून भारतीय संघाने फायनलमध्ये धडक मारली पण ऑस्ट्रेलियन संघ आधीच फायनलमध्ये पोहोचला होता.

पहिल्या आवृत्तीमध्ये ऑस्ट्रेलियन संघ गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर होता. त्या मोसमात भारत आणि न्यूझीलंडमध्ये अंतिम सामना झाला. साउथहॅम्प्टनमध्ये झालेल्या त्या सामन्यात किवी संघाने टीम इंडियाचा पराभव करून आयसीसीचे पहिले विजेतेपद पटकावले.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पहिल्या आवृत्तीची आठवण करून, कमिन्सने असे विधान केले की, आम्ही भारताला याआधी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत नेले होते, मला वाटते की लोक ते विसरले आहेत. कदाचित त्यावेळी आपल्याला त्याच्याबद्दल फारशी कल्पना आली नसावी कारण तेव्हा सर्व काही नवीन होते.

प्रत्यक्षात झाले असे की, भारताविरुद्धच्या मेलबर्न कसोटीत ऑस्ट्रेलियाला स्लो ओव्हर रेटमुळे गुण गमवावे लागले. ज्याचा फटका त्यांना सहन करावा लागला आणि न्यूझीलंड अंतिम फेरीसाठी पात्र ठरला.

कमिन्स पुढे म्हणाले की, गेल्या वेळी डब्ल्यूटीसीच्या पहिल्या फायनलमध्ये न्यूझीलंडने इंग्लंडमध्ये चांगला खेळ केला होता. आपण तिथे असायला हवे होते. हे लक्षात घेऊन आम्ही यावेळी खेळलो आणि पहिली संधी गमावल्यानंतर या वेळी आम्हाला आणखी चांगली कामगिरी करण्याची प्रेरणा मिळाली.

आयसीसीच्या बाद फेरीतील भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ही 7 वी सामना असेल. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमधील भारताची ही सलग दुसरी अंतिम फेरी आहे. टीम इंडियाचा 10 वर्षांचा ICC ट्रॉफीचा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न असेल. दुसरीकडे ऑस्ट्रेलियन संघ डब्ल्यूटीसी जेतेपद जिंकून असा पराक्रम करेल, जो आतापर्यंत जगातील कोणत्याही संघाला करता आलेला नाही. मात्र टीम इंडिया हा विक्रमही आपल्या नावावर करू शकते. आता कोण बाजी मारतो हे पाहावे लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime: तुझ्याशी बोलायचंय, काम झाल्यावर भेट...; विवाहित प्रियकरानं महिलेला बोलवलं, भयंकर कट रचून संपवलं, कारण काय?

Latest Marathi News Live Update : भाजपच्या मंचावरुन अजित पवारांच्या नेत्यांवर निशाणा

सुभेदारांचा जावई येतोय... 'ठरलं तर मग' मध्ये होणार अस्मिताच्या नवऱ्याची एण्ट्री; कोण आहे हा अभिनेता जो साक्षीसोबत करतोय फ्लर्ट?

Weekly Horoscope Prediction 2025: 'या' आठवड्यात कर्कसह 2 राशींवर राहील धनलाभाचा वर्षाव, नोकरीत मिळेल प्रमोशन!

'तू वॅक्स केलय?' संजय दत्तसोबतच्या बेडरुम सीनवेळी सोनाली कुलकर्णींला हेअर स्टायलिस्टने विचारलेला विचित्र प्रश्न

SCROLL FOR NEXT