Australian Cricketers Rod Marsh esakal
क्रीडा

हृदयविकाराच्या झटक्यानं ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटपटू कोमात

सकाळ डिजिटल टीम

'मार्श यांना वेळेत उपचाराकरिता नेलं नसतं, तर त्यांचा जीव वाचवणं कठीण होतं.'

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाचे दिग्गज क्रिकेटपटू रॉड मार्श (Australian Cricketers Rod Marsh) यांना हृदयविकाराचा झटका (Heart Attack) आला असून ते कोमात गेले आहेत. एका धर्मादाय कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी रॉड मार्श बुंडाबर्ग येथे गेले होते, त्यावेळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर बुल्स मास्टर्सचे आयोजक जॉन ग्लॅनविल आणि डेव्हिड हिलियर यांनी त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल केलं.

बुल्स मास्टर्सचे जिमी माहेर म्हणाले, 'डेव्हिड हिलियर आणि मी मार्श यांना वेळेत उपचाराकरिता नेलं नसतं, तर त्यांचा जीव वाचवणं कठीण होतं.' 74 वर्षीय रॉड मार्श यांनी 1970 ते 1984 दरम्यान ऑस्ट्रेलियाकडून 96 कसोटी सामने खेळले. यादरम्यान त्यांनी 26.51 च्या सरासरीनं 3 हजार 633 धावा केल्या. त्यांच्या नावावर 3 शतकं आणि 16 अर्धशतकं आहेत.

रॉड मार्श ऑस्ट्रेलियाचे निवडकर्तेही आहेत

मार्श यांनी 92 एकदिवसीय सामन्यांमध्ये आपल्या देशाचं प्रतिनिधित्व केलंय. त्यामध्ये त्यांनी 1225 धावा केल्या. त्यांच्या नावावर 4 अर्धशतकं आहेत. रॉड मार्श 2016 पर्यंत ऑस्ट्रेलियाच्या पुरुष संघाचे निवडकर्तेही होते. ऑस्ट्रेलियन क्रिकेट असोसिएशनने मार्श यांच्या कुटुंबाच्या वतीनं एक निवेदन जारी केलंय. त्यात त्यांनी रॉड मार्श जीवनाशी झुंज देत असल्याचं म्हंटलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: ''तुम्ही बंजारा समाजासारखे दिसत नसतानाही आरक्षण का खाल्लं?'', धनंजय मुंडेंना उद्देशून जरांगेंचं मोठं विधान

अडीच वर्षांपूर्वी विवाह, पतीसह सासरच्यांकडून छळ; पोलिसाच्या पत्नीनं तिसऱ्या मजल्यावरून उडी घेत संपवलं जीवन, दिरानं रुग्णालयात नेलं, पण...

IND vs WI 1st Test Live: अरे आताच फिफ्टी झाली होती, कशाला घाई केली! Shubman Gill चा चुकीचा फटका अन् विंडीजला मिळाली विकेट

Crop Loss: पिकेच झाली उद्‍ध्वस्त, खत देणार कशाला? नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे ७० हजार टनांहून अधिक साठा पडून

Layoff 2025: अमेरिकन कंपनीचा धक्कादायक निर्णय; 4 मिनिटांच्या कॉलमध्येच भारतीय कर्मचाऱ्यांना कामावरुन काढलं

SCROLL FOR NEXT