Australian Open 2021, Djokovic, Zverev, Aslan Karatsev,semi 
क्रीडा

Australian Open 2021 : संघर्षमय लढतीत जोकोविच जिंकला, सेमीफायनलचा पेपर सोपा

सकाळ ऑनलाईन टीम

मेलबर्न : टेनिस जगतातील अव्वल मानांकित आणि ऑस्ट्रेलियन ओपनचा विक्रमी आठवेळा जेतेपद पटकावणाऱ्या सर्बियाच्या नोवाक जोकोविचने संघर्षमय लढतीत विजय नोंदवत सेमीफायनल गाठली. त्याला जर्मनीच्या  अ‍ॅलेक्झांडर झ्वेरेव चांगलेच दमवलं. पहिल्या सेट गमावलेल्या जोकोविचन दमदार कमबॅक करत अनुभवाच्या जोरावर अखेर 6-7, 6-2, 6-4, 7-6 अशा फरकाने सामना जिंकत ऑस्ट्रेलिय ओपनमधील आपला प्रवास कायम ठेवला. 

झ्वेरेव आणि जोकोविच यांच्यातील सामना तब्बल 3 तास 30 मिनिटे रंगला होता. जोकोविचने पहिला सेट टाय ब्रेकमध्ये गमावला. झ्वेरेवने हा सेट 8-6 असा आपल्या नावे केला. त्यानंतर जोरदार पुनरागमन करत जोकोविचने पुढील दोन से 6-2, 6-4 असे जिंकले. चौथ्य सेटमध्ये दोघांच्यात चांगलीच रंगत झाली. हा सेटही ट्राय ब्रेकमध्ये गेला. अखेर जोकोविचने 8-6 अशी बाजी मारली.  

पुरुष एकेरीतील दुसऱ्या क्वार्टरफायनलमध्ये  रशियाच्या  असलान ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली. त्याने पदार्पणाच्या ग्रँडस्लॅममध्ये सेमीफायनल गाठली. बल्गेरियाच्या ग्रिगोर दिमित्रोव्ह आणि रशियन असलान यांच्यात दुसऱ्या क्वार्टर फायनलची रंगत लढती होती. पहिल्या ग्रँण्डस्लॅम खेळणाऱ्या असलानने पहिला सेट 2-6 असा गमावला. मात्र त्यानंतर जोरदार कमबॅक करत त्याने पुढील तिन्ही सेटमध्ये आपला दबदबा राखला. त्याने हा सामना 2-6, 6-4, 6-1, 6-2 असा जिंकला. पहिल्या सेमीफायनलमध्ये त्याच्यासमोर आता जोकोविचचं तगड आव्हान असणार आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Goodluck Cafe Viral Video: पुण्यातील गुडलक कॅफेत बन मस्कामध्ये काचेचा तुकडा; खवय्यांमध्ये संताप, व्हिडिओ व्हायरल

टोमणे सहन न झाल्याने टेनिसपट्टू राधिकावर बापानेच झाडल्या गोळ्या; पोलिस तपासात धक्कादायक बाबी उघड, नेमकं काय घडलं?

PG Medical Courses: आरोग्य विद्यापीठाचे पीजी प्रवेश सुरू; तीन अभ्यासक्रमांच्या प्रवेश अर्जासाठी १३ जुलैपर्यंत मुदत

Space Technology Agriculture: स्पेस टेक्नोलॉजीमुळे शेतीत होईल क्रांती! इस्रो शिकवणार उपग्रहांचा शेतीमध्ये उपयोग, आजच करा अर्ज!

संगमनेर हादरलं! 'भूमिगत गटारात गुदमरून दोन कामगारांचा मृत्यू'; ठेकेदाराचा निष्काळजीपणा जबाबदार, नेमकं काय घडलं..

SCROLL FOR NEXT