Australian Open Rafael Nadal Reached In second round esakal
क्रीडा

राफेल नदाल, बार्ती, ओसाकाची वाटचाल

सकाळ वृत्तसेवा

मेलबर्न, ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस ‘ग्रँड स्लॅम’मध्ये बुधवारी मानांकित खेळाडूंनी अपेक्षेप्रमाणे कामगिरी करीत प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवले. पुरुषांच्या एकेरीत राफेल नदाल, ॲलेक्झांडर झ्वरेव व महिला एकेरीत ॲश्‍ले बार्ती, नाओमी ओसाका यांनी प्रतिस्पर्धी टेनिसपटूंना हरवून तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. (Australian Open 2022 Rafael Nadal Ashleigh Barty Match Result)

नदालने जर्मनीच्या यानिक हँफमॅनवर ६-२, ६-३, ६-४ अशा फरकाने दोन तास व ४२ मिनिटांमध्ये विजय मिळवला. तिसरा मानांकित झ्वरेवने ऑस्ट्रेलियाच्या जॉन मिलमॅनला ६-४, ६-४, ६-० अशा फरकाने हरवले. कॅनडाच्या डेनिस शापोवालोवने एस. क्वोन याचे कडवे आव्हान ७-६, ६-७, ६-७, ७-५, ६-२ अशा पाच सेटमध्ये परतवून लावले. शापोवालोवने चार तास २५ मिनिटांमध्ये ही लढत जिंकली. याखेरीज मॅटीयो बेरेंट्टीनी, पाब्लो कॅरेनो बुस्टा, सेबॅस्टीयन कोर्डा व कॅरेन खाचानोव यांनीही पुरुषांच्या एकेरीत आगेकूच केली.

ओस्तापेंकोचा संघर्षपूर्ण विजय

येलेना ओस्तापेंकोने एलीसन रिस्कवर ४-६, ६-२, ६-४ अशा फरकाने संघर्षपूर्ण विजय मिळवला. तसेच एच. टॅनने माघार घेतल्यामुळे इलीना स्वितोलीनाला पुढल्या फेरीत पोचता आले. टॅनने माघार घेतली तेव्हा इलीना स्वितोलीना ६-३, ५-७, ५-१ अशा फरकाने पुढे होती. ॲश्‍ले बार्तीने लुसीया ब्राँझेटीवर ६-१, ६-१ अशा फरकाने विजय मिळवला. नाओमी ओसाकाने मेडीसन ब्रिगंल हिला ६-०, ६-४ अशा फरकाने नमवले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS Officers Transfer: राज्यात वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या मोठ्या बदल्या; पुणे, नाशिकमध्येही मोठे फेरबदल, कुणाची बदली कुठे?

Who is Akash Maharaj Singh? ऋतुराज संजू, उर्विल यांना बाद करून खिशातून काढला कागद... काय लिहिलंय माहित्येय? Video Viral

ब्युटी पार्लरमध्ये मार्गदर्शन, पुण्यात विशेष कोचिंग अन्... NEET पेपरफुटीचा ‘मास्टरमाईंड’ पी. व्ही. कुलकर्णी नेमका कोण?

CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सार्वजनिक वाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी केला इंडिगो विमानाने प्रवास

आजोबांच्या धाकाने शेणाने जमीन सारवायची माधुरी दीक्षित; मूळ कोकणातली आहे धकधक गर्ल, गावाचं नाव माहितीये?

SCROLL FOR NEXT