Australian Open Sania Mirza - Rajeev Ram won first round esakal
क्रीडा

Australian Open: सानिया मिर्झा - राजीव रामचा मिश्र दुहेरीत सहज विजय

अनिरुद्ध संकपाळ

मेलबर्न: भारताची सानिया मिर्झा (Sania Mirza) आणि भारतीय वंशाचा अमेरिकन टेनिसपटू राजीव राम (Rajeev Ram) यांनी ऑस्ट्रेलियान ओपनच्या (Australian Open) मिश्र दुहेरीत पहिल्या फेरीत अलेक्झांड्रा क्रुनिर आणि निकोला कॅकिक या जोडीचा ६-३, ७-६ (७-३) असा पराभव केला. याचबरोबर सानिया आणि राजीवने मिश्र दुहेरीची (Mix Double) दुसरी फेरी गाठली.

सानिया मिर्झाची (Sania Mirza) ही शेवटची ऑस्ट्रेलियन ओपन असणार आहे. तिने पहिल्या सामन्यात तरी चांगला फॉर्म दाखवला आहे. तिचा पार्टनर देखील राजीव राम देखील चांगल्या लयीत होता. तो सध्या दुहेरीच्या जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानावर आहे. राजीव रामने आपल्या अचूक सर्व्हने पहिला गेम सहज जिंकला. त्यानंतर सानिया मिर्झानेही चांगला खेळ केला. चौथ्या गेममध्ये या जोडीने क्रुनिक आणि कॅकिक जोडीची सर्व्हिस ब्रेक केली. त्यानंतर ३ - १ अशी आघाडी घेण्यात यश मिळाला. अखेर सानिया आणि राजीवने पहिला सेट ६- ३ असा जिंकला.

पहिला सेट जिंकल्यानंतर सानिया आणि राजीवला (Sania Mirza - Rajeev Ram) क्रुनिक आणि कॅकिकने दुसऱ्या सेटमध्ये चांगलीच टक्कर दिली. दोन्ही जोड्यांनी अप्रतिम सर्व्हिस करत ती ब्रेक होऊ दिली नाही. त्यामुळे दुसरा सेट टाय ब्रेकरवर गेला. टाय ब्रेकरमध्ये सानिया आणि रामने ३-१ अशी आघाडी घेतली अखेर टाय ब्रेकर ७ -३ असा जिंकत सामना खिशात टाकला.

सानिया मिर्झाने महिला दुहेरीचा पहिलाच सामना गमावल्यानंतर निवृत्तीची घोषणा केली होती. तिने हा हंगाम आपला शेवटचा हंगाम असणार आहे असे सांगितले. त्यामुळे ही ऑस्ट्रेलियन ओपन तिची शेवटची ऑस्ट्रेलियन ओपन असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT