Axar Patel Deepak Chahar Trolled Yuzvendra Chahal After Zimbabwe Vs India 1st ODI Video Gone Viral esakal
क्रीडा

VIDEO : 'तू चहल भाईची जागा घेतलीस...' दीपक चाहर - अक्षरने युझवेंद्रला केले ट्रोल | Yuzvendra Chahal

अनिरुद्ध संकपाळ

Axar Patel Deepak Chahar Trolled Yuzvendra Chahal : भारताने केएल राहुलच्या नेतृत्वाखाली झिम्बावेविरूद्धचा पहिला सामना 10 विकेट्स राखून जिंकला. भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत 1 - 0 अशी आघाडी घेतली आहे. भारताने झिम्बावेचे 190 धावांचे आव्हान बिनबाद पार केले. भारताच्या विजयात दीपक चाहर आणि अक्षर पटेल या दोन गोलंदाजांचा मोलाचा वाटा होता. दीपक चाहरने 27 धावात तीन विकेट घेतल्या. अक्षर पटेलने देखील तीन विकेट घेत त्याला चांगली साथ दिली. दरम्यान, सामना संपल्यानंतर अक्षर पटेलने दीपक चाहरची मुलाखत घेतली. यावेळी त्याने युझवेंद्र चहलला देखील ट्रोल केले. (Axar Patel Trolled Yuzvendra Chahal After Zimbabwe Vs India 1st ODI)

सर्वसाधारणपणे बीसीसीआय टीव्हीवर मुलाखत घेण्यासाठी युझवेंद्र चहल आघाडीवर असतो. मात्र त्याच्या अनुपस्थितीत अक्षर पटेलने देखील मुलाखतकाराची भुमिका बजावली आहे. झिम्बावे विरूद्धच्या पहिल्या सामन्यानंतर देखील अक्षर पटेलने मुलाखत घेण्यास सुरूवात केली.

यावेळी दीपक चहरने अक्षरला तू युझवेंद्र चहल भाईची जागा घेतली आहेस असे म्हणत ट्रोल केले. यावर अक्षर पटेलने देखील चेष्टा मस्करीच्या मूडमध्ये नाही नाही जर मी त्याची जागा घेतली तर तो काय करणार त्याला चहल टीव्ही देखील चालवायचा आहे. यावर दीपक चाहर म्हणाला की प्रत्येकाची वेळ येते. आता तुझी वेळ आली आहे.' अशा प्रकारे या दोघांनी मिळून युझवेंद्र चहलची खेचली. सोशल मीडियावर सध्या हा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यात जोरदार पावसाची अचानक हजेरी, नागरिकांची उडाली तारांबळ; घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

Child Crime: अल्पवयीन गुन्हेगारांना आता सवलत नाही? वयोमर्यादा १८ वरून १६ वर्षांवर आणणार; महाराष्ट्र सरकारचा मास्टरस्ट्रोक

सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याला 'त्या' गोष्टीची वाटायची प्रचंड भीती, इतक्या वर्षानंतर झाला खुलासा

Latest Marathi News Live Update : बीडमध्ये शेतीच्या वादातून तलवारीचा हल्ला; काकाची बोटं छाटली, चुलत भावावरही वार

SCROLL FOR NEXT