Venkatesh Prasad esakal
क्रीडा

Ayodhya Ram Mandir : एकच नारा, एकच नाव... व्यंकटेश प्रसाद अयोध्येत पोहचताच काय म्हणाला?

व्यंकटेश प्रसादने अयोध्येत पोहचताच शेअर केला व्हिडिओ

अनिरुद्ध संकपाळ

Ayodhya Ram Mandir Venkatesh Prasad : अयोध्यात आज राम मंदिरात रामलल्लांच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला. राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळा हा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पार पडला. यावेळी देशातील अनेक प्रसिद्ध व्यक्ती उपस्थित होत्या. भारताचे आजी - माजी क्रिकेटपटू देखील यावेळी उपस्थित होते. भारताचा माजी गोलंदाज व्यंकटेश प्रसादला देखील या सोहळ्याचे निमंत्रण होते.

अयोध्येत पोहचल्यानंतर व्यंकटेश प्रसादने राममय वातावरणात आपला एक फोटो काढला अन् तो सोशल मीडिायवर शेअर केला. यावेळी त्याने लिहिले की, आयुष्यातील सर्वात मोठा क्षण अनुभवण्यासाठी जात आहे धर्मपथ! एकच नारा, एकच नाव जय श्री राम!

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने रविवारी घोषित केलं होतं की रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळा हा संगीतमय होईल. अयोध्येतील राम मंदिर हे पारंपरिक नगारा स्टाईलने बांधण्यात आलं आहे. त्याची पूर्व पश्चिम लांबी ही 380 फूट असून रूंदी ही 250 फूट आहे. मंदिराची उंची ही 161 फूट आहे. राम मंदिराला एकूण 392 खांब असून 44 द्वार आहे.

मंदिराच्या खांब आणि भिंतींवर हिंदू देवी देववतांची शिल्प कोरली आहेत. मंदिरातील मुख्य गर्भगृह हे ग्राऊंड फ्लोअरवर आहे. तेथे प्रभू श्री रामलल्लांची मूर्ती विराजमान आहे.

मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार हे पूर्वेला असून तेथे पोहचण्यासाठी आधी 32 पायऱ्या चढाव्या लागतात. त्यानंतर मुख्य सिंहद्वारातून मंदिरात प्रवेश करता येतो. या मंदिरात एकूण पाच मंडप आहेत. नृत्य मंडप, रंग मंडप, सभा मंडप, प्रार्थना मंडप आणि किर्तन मंडप अशी या पाच मंडपांची नावे आहेत.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News: धक्कादायक ! ६७ वर्षांच्या प्रियकराने ३० वर्षांच्या प्रेयसीची केली हत्या, ३ वर्षांचा मुलगा गंभीर जखमी

Online Gaming Bill 2025: Asia Cup पूर्वीच ड्रीम 11ची माघार; बीसीसीआयला किती कोटींचे नुकसान होणार?

Satara News:'मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनाला फलटणकरांचा पाठिंबा'; पुन्हा सरकारविरुद्ध आक्रमक भूमिका

Mercury Transit 2025: बुध ग्रहाचा मघा नक्षत्रात गोचर; जाणून घ्या कोणत्या राशींना होईल धनलाभ!

Nasik Police : ‘डायल ११२’ वर कॉल करा आणि ४ मिनिटांत पोलिसांना बोलवा! नाशिक पोलिसांचा ‘रिस्पॉन्स टाइम’ देशात सर्वोत्कृष्ट

SCROLL FOR NEXT