Babar Azam creates massive world record 
क्रीडा

बाबर आझमचा करिष्मा; आणखी एक 'वर्ल्ड रेकॉर्ड'

बाबरला जरी शतक करता आलं नाही तरी विशेष विश्वविक्रम

Kiran Mahanavar

PAK vs WI 2nd ODI : मुलतानमध्ये शुक्रवारी झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानने वेस्ट इंडिजचा 120 धावांनी पराभव केला, आणि एकदिवसीय मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली. दुसऱ्या वनडे सामन्यात पण पुन्हा एकदा कर्णधार बाबर आझमने शानदार फलंदाजी करत 93 चेंडूत 6 चौकार मारले आणि 77 धावा केल्या. बाबरला जरी शतक करता आलं नाही तरी विशेष विश्वविक्रम करण्यात तो यशस्वी बनला आहे. (Babar Azam creates massive world record)

बाबर आझमने आंतरराष्‍ट्रीय क्रिकेटमध्‍ये सलग 9 इनिंगमध्‍ये 50 पेक्षा अधिक धावा केल्या आहे. म्हणजेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलग 9 डावात 50 किंवा त्याहून अधिक धावा करण्याचा विक्रम याआधी कोणत्याही फलंदाजाच्या नावावर नव्हता. बाबरने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यात १९६ धावा करून त्याची सुरुवात केली. यानंतर तिसऱ्या आणि शेवटच्या कसोटीत पाकिस्तानी कर्णधाराने ६६ आणि ५५ धावांची खेळी केली. बाबरने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 3 वनडे मालिकेत 57, 117 आणि नाबाद 105 धावा केल्या.

बाबरने त्याचवेळी एकमेव टी-20 सामन्यात 66 धावा करण्यात तो यशस्वी ठरला. वेस्ट इंडिजविरुद्धच्या आता त्याने एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात 103 धावा केल्या, त्यानंतर दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 77 धावा केल्या. म्हणजेच गेल्या 9 आंतरराष्ट्रीय डावांमध्ये बाबर अर्धशतक किंवा शतक झळकावताना दिसला आहे. बाबरचा हा अप्रतिम पराक्रम आनंददायी आहे.

बाबरने पहिल्या वनडेत १०३ धावांची इनिंग खेळून कर्णधार म्हणून विराटचा खास विक्रम मोडला होता. बाबर आता कर्णधार म्हणून एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात लवकर 1000 धावा करणारा फलंदाज बनला आहे. यापूर्वी हा विक्रम विराट कोहलीच्या नावावर होता. कर्णधार म्हणून कोहलीने 17 डावात 1000 धावा पूर्ण केल्या. बाबरने कर्णधार म्हणून 13 डावात 1000 धावा केल्या आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur : शेतकऱ्यानं म्हशी घ्यायला ७ लाख साठवले, सहावीत शिकणाऱ्या लेकानं गेमवर ५ लाख उडवले; बँक स्टेटमेंट बघून बसला धक्का

India Vs England : दुसऱ्या कसोटीतील लाजीरवाण्या पराभवानंतर इंग्लंडचा मोठा निर्णय, 'या' वेगवान गोलंदाजाचा केला संघात समावेश

Weekly Astrology 7 to 13 July 2025: या आठवड्यात कोणत्या राशींना होणार आर्थिक लाभ अन् नोकरी व्यवसायत मिळेल उत्तम संधी, वाचा साप्ताहिक राशिभविष्य

Latest Maharashtra News Updates : चांदोरीतील गोदावरी नदीपात्राच्या बाहेर पाणी, खंडेराव महाराज मंदिराला पाण्याचा वेढा

Global Club Championship: पाकिस्तानला डावलण्याची शक्यता; जागतिक क्लब अजिंक्यपद स्पर्धा : पाच संघांचा सहभाग

SCROLL FOR NEXT