babar azam gave a loud speech in the dressing room  
क्रीडा

Babar Azam : पराभूत बाबरचा ड्रेसिंग रूम मधला व्हिडिओ व्हायरल

बाबर आझमने ड्रेसिंग रूम मध्ये केले जोरदार भाषण

Kiran Mahanavar

Babar Azam IND vs PAK : भारताने 2022 च्या टी-20 विश्वचषकाची सुरुवात विजयाने केली. सुपर-12 च्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानचा चार विकेट्सने पराभव केला. पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा भारताकडून पराभव झाल्यानंतर कर्णधार बाबर आझमने ड्रेसिंग रूम मध्ये जोरदार भाषण केले. हा व्हिडिओ पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आपल्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केला आहे.

यादरम्यान बाबरसोबत संघाचा मार्गदर्शक मॅथ्यू हीटनही पाकिस्तानी संघाला प्रोत्साहन देताना दिसले. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने भारतासमोर विजयासाठी 160 धावांचे लक्ष्य ठेवले होते, ही धावसंख्या विराट कोहलीच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर टीम इंडियाने शेवटच्या चेंडूवर गाठली. कोहलीने 53 चेंडूत 82 धावांची नाबाद खेळी खेळली.

कोहली चेस मास्टर आणि मॅच विनर म्हणून परतला आहे. या विजयासह टीम इंडियाने गतवर्षी टी-20 विश्वचषकातील पराभवाचा बदलाही घेतला. गेल्या वर्षी पाकिस्तानने भारताचा 10 विकेट्सने पराभव केला होता. तेव्हा संघाचा कर्णधार विराट कोहली होता.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये बाबर आझम म्हणतो की, ''खूप चांगला सामना झाला. प्रत्येक वेळी मी म्हणतो की आपण प्रयत्न केला पण आपल्याकडून काही चुका झाल्या आहेत, त्यातून आपल्याला शिकायचे आहे. हार मानायची गरज नाही कारण स्पर्धा नुकतीच सुरू झाली आहे, बरेच सामने बाकी आहेत. आपण एका खेळाडूमुळे हरलो नाही, तर सर्वांमुळे हरलो आहे. कोणीही कोणाकडे बोट दाखवू नये की त्याने पराभूत केले किंवा माझ्यामुळे पराभूत झाला. तसे या संघात होणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Explained: तुमचं लक्षही नव्हतं अन् लोकसभेत ३ मिनिटांत मोठा निर्णय! २:१२ ला सादर, २:१५ ला मंजूर; प्रत्येकाच्या कामाची माहिती

Women's Asia Cup: महिला आशिया करंडकाबाबत संभ्रम; अजून अधिकृत घोषणेची प्रतीक्षा

DY Patil Story: एका पराभवाने सोडलं राजकारण अन् बनले शिक्षणमहर्षी! डॉ. डी. वाय पाटील यांची प्रेरणादायी वाटचाल

Latest Marathi News Live Update : मोदी सरकारला मोठा धक्का! युसूफ पठाणसह तीन खासदारांचा NDA ला पाठिंबा देण्यास नकार

Amravati Kidney Donation: सासूने किडनी दान करून जावयाला दिले नवजीवन; शहरातील सुपर स्पेशालिटी रुग्णालयात ७५ वे यशस्वी किडनी प्रत्यारोपण

SCROLL FOR NEXT