Babar Azam Old Welcome Zimbaway Tweet Viral sakal
क्रीडा

Babar Azam : "झिम्बाब्वे लिहिता येईना अन्..." जुन्या ट्विटमुळे पाक कर्णधार होतोय ट्रोल

झिम्बाब्वेविरुद्धच्या पराभवानंतर बाबर आझमचे वर्ष जुने ट्विट व्हायरल, ट्रोल आर्मीची मस्ती

Kiran Mahanavar

Babar Azam Old Welcome Zimbaway Tweet Viral : पाकिस्तानला टी-20 विश्वचषक 2022 च्या त्यांच्या दुसऱ्या सामन्यात झिम्बाब्वेविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले आहे. झिम्बाब्वेसारख्या कमकुवत संघाविरुद्ध पराभव पाकिस्तान टीमचे माजी क्रिकेटपटू पचवू शकले नाहीत. सध्याचा संघाचा कर्णधार बाबर आझमचा क्लास त्याने सुरू केला आणि बाबर आर्मीवर जोरदार टीका करत आहेत.

दरम्यान, बाबर आझमचे सात वर्ष जुने ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले असून चाहते या ट्विटवर त्यांची खिल्ली उडवत आहेत. पाकिस्तानी कर्णधाराने हे ट्विट 2015 मध्ये केले होते. यादरम्यान त्यांनी ट्विट करताना लिहिले, 'झिम्बाब्वेमध्ये तुमचे स्वागत आहे.' यावेळी बाबर आझमने झिम्बाब्वेचे स्पेलिंग चुकीचे लिहिले होते. पाकिस्तान क्रिकेट संघ नेहमीच आपल्या चुकीचे इंग्लिश बोलण्यासाठी ओळखला जातो. अनेकवेळा या कारणावरून संघाचा कर्णधार आणि खेळाडू ट्रोल झाले आहेत.

झिम्बाब्वे संघ 2015 मध्ये पाकिस्तानच्या दौऱ्यावर गेला होता. त्यानंतर दोन्ही संघांमध्ये 3 एकदिवसीय आणि 2 टी-20 सामन्यांची मालिका खेळवल्या गेली. झिम्बाब्वेचा संघ पाकिस्तानात पोहोचला त्याचवेळी बाबर आझमने स्वागत करण्यासाठी हे ट्विट केले होते. तेव्हा बाबरने लिहिले, 'वेलकम झिम्बावे.ट मग काय होतं, या ट्विटमुळे बाबर अजूनही ट्रोल होत आहेत.

बाबर आझमला ट्रोल करत एका यूजरने लिहिले की, तुम्ही झिम्बाब्वेचे चुकीचे स्पेलिंग लिहिल्याचा बदला त्याने घेतला आहे. त्याचवेळी दुसऱ्या युजरने लिहिले की, ऑस्ट्रेलिया विमानतळावरून पाकिस्तानमध्ये स्वागत आहे.

पाकिस्‍तानी संघ आधी टीम इंडियाकडून पराभूत झाला, त्यानंतर त्याला झिम्बाब्वेसारख्या कमकुवत संघाकडून पराभवाला सामोरे जावे लागले. दोन्ही सामने शेवटच्या षटकापर्यंत गेले. झिम्बाब्वेने पाकिस्तानचा एका धावेने पराभव केला. तर भारतीय संघाने 4 गडी राखून पराभव केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aaditya Thackeray: आता महाराष्ट्र बंद पाडणार, आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा; थेट पोलीस व्हॅनवर चढून...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माची १८ चेंडूत फिफ्टी अन् रचले तब्बल तीन विश्वविक्रम; सूर्यकुमारलाही टाकलं मागे

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापूर वेशीवर पुन्हा बिबट्या; शिंगणापूर मार्गावर बिबट्याचे दर्शन, वनविभागाकडून शोधमोहीम

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

CJP Leaders Serious Allegation : "आमचे मोबाईल घेतले होते, त्यावेळी त्यात खोटे पुरावे घातल्याची आम्हाला भीती!"; सुटकेनंतर सीजेपीच्या नेत्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT