Virat Kohli And Babar Babar Azam
Virat Kohli And Babar Babar Azam  Sakal
क्रीडा

कोहलीच्या कानात काय सांगितल? बाबर म्हणाला...

सुशांत जाधव

T20 WC, India Vs Pakistan: टी-20 वर्ल्डकप स्पर्धेतील सलामीच्या लढतीत पाकिस्तानने पहिल्यांदाच भारतीय संघाला पराभवाचा दणका दिल्याचे पाहायला मिळाले. या सामन्याने एक खास रेकॉर्डही नोंदवला. हा सामना टी-20 वर्ल्ड कपच्या इतिहासात सर्वाधिक पाहिला गेला. याशिवाय भारत-पाक यांच्यातील लढतीनंतर दोन्ही संघातील खेळाडूंच्या खिलाडीवृत्तीची चर्चाही रंगल्याचे पाहायला मिळाले. वर्ल्ड कप स्पर्धेतील या सामन्यानंतर पाकिस्तानी संघाचा कर्णधार बाबर आझम भारतीय संघाच्या कर्णधाराच्या कानात काहीतरी सांगताना दिसले होते. यावेळी बाबरनं किंग कोहलीच्या कानात नेमकं काय सांगितलं हा प्रश्न तमाम क्रिकेट चाहत्यांना पडला होता. कोहलीसोबत जे काही बोलणं झालं ते अजूनही गुलदस्त्यातच आहे.

पाकिस्तानी पत्रकाराने याच उत्तर काढण्याचा प्रयत्न केला. त्याने बाबरला यासंदर्भात प्रश्न विचारला होता. यावर बाबर म्हणाला की, कोहलीसोबत जे बोललो ते मी सार्वजनिक करु शकत नाही. त्यानंतर या पत्रकाराने कोहलीच्या कॅप्टन्सीसंदर्भातही बाबरला प्रश्न विचारला होता. पण पाकिस्तानी मीडिया मॅनेजरने ही पत्रकार परिषद पाकिस्तान वेस्ट इंडीज मालिकेसंदर्भात असल्याचे सांगत विराटसंदर्भातील प्रश्नाला बगल दिली.

विराटच्या कानात काय सांगितले? या प्रश्नावर बाबरनं दिलेलं उत्तर हे क्रिकेट चाहत्यांच्या मनात ही गोष्ट आणखी रुजवणारी अशीच आहे. भविष्यात कोहली तरी ही गोष्ट उघड करणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. युएईच्या मैदानात रंगलेल्या टी-वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तानने भारतीय संघाला पराभूत करण्याची किमया करुन दाखवली होती. युएईतील स्पर्धेत भारतीय संघाला जेतेपदाचे प्रबळ दावेदार मानले जात होते. ज्यावेळी पाकिस्तानने टीम इंडियाला पराभवाचा धक्का दिला त्यावेळी पाकिस्तान दुसऱ्यांदा वर्ल्ड कप जिंकेल, असे बोलले गेले. पण ऑस्ट्रेलियाने सेमी फायनलमध्ये पाकिस्तानचा खेळ खल्लास केला. पाकिस्तानला नमवणाऱ्या ऑस्ट्रेलियाने फायनलमध्ये न्यूझीलंडला शह देत पहिला वहिला टी-20 वर्ल्ड कप जिंकला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: कल्याण लोकसभेत सगळे रेकॉर्ड मोडा, गुलाल उधळायला मी स्वतः येणार!

Crime News : प्रेम प्रकरणातून तरुणाचा स्क्रू ड्रायव्हरने खून; बहिणीसमोरच भररस्त्यात प्रियकराला भोसकले

LED Screen Cleaning: घरगुती वस्तूंनी LED स्क्रीन करा स्वच्छ, फक्त करू नका 'या' चुका

Madgaon Express: बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातल्यानंतर ओटीटीवर रिलीज झाला 'मडगाव एक्सप्रेस'; कोणत्या प्लॅटफॉर्मवर पाहू शकता चित्रपट? जाणून घ्या...

Latest Marathi News Live Update : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नवी मुंबईत

SCROLL FOR NEXT