Babar Azam resigns as Pakistan captain in all formats  esakal
क्रीडा

Babar Azam Resigns : बाबरशाही संपली! वर्ल्ड कपमधील खराब कामगिरीनंतर कर्णधारपदाचा दिला राजीनामा

Kiran Mahanavar

Babar Azam resigns as Pakistan captain in all formats : वर्ल्ड कप 2023 मध्ये संघाच्या खराब कामगिरीनंतर बाबर आझमने पाकिस्तान क्रिकेट संघाचे कर्णधारपद सोडले आहे.

बाबरने बुधवारी 15 नोव्हेंबरला एक निवेदन जारी केले आणि सर्व फॉरमॅटमध्ये संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला. बाबर आझमला 2019 मध्ये पहिल्यांदा पाकिस्तानी संघाचा कर्णधार बनवण्यात आले आणि 2021 मध्ये तो तिन्ही फॉरमॅटचा कर्णधार बनला होता.

पाकिस्तानने वर्ल्ड कप 2023 मध्ये आपला शेवटचा सामना शनिवारी 11 नोव्हेंबरला खेळला होता, ज्यामध्ये इंग्लंडने त्याचा मोठ्या फरकाने पराभव केला. आणि पाकिस्तानला पाचव्या पराभवाला सामोरे जावे लागले.

या पराभवानंतर बाबर आणि त्याची टीम सोमवारी 13 नोव्हेंबरला पाकिस्तानात पोहोचली. बाबर लाहोरमधील त्याच्या घरी पोहोचला होता आणि तेव्हापासून बाबर आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या बैठकीत काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पण आज बुधवारी त्याने आपल्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला.

बाबरने कर्णधारपद सोडण्याबाबत सोशल मीडियावर लिहिले की, “मला अजूनही तो क्षण स्पष्टपणे आठवतो जेव्हा 2019 मध्ये मला पीसीबीकडून पाकिस्तानचे कर्णधारपदासाठी कॉल आला होता.

त्याने पुढे लिहिले की, 'पांढऱ्या चेंडूच्या फॉर्मेटमध्ये संघाला पहिल्या क्रमांकावर पोहोचणे हा कोच, खेळाडू आणि संघ व्यवस्थापनाचा प्रयत्न होता. आणि या प्रवासात पाकिस्तानी चाहत्यांनी दिलेल्या अतुट पाठिंब्याबद्दल मी त्यांचे आभार मानू इच्छितो. आज मी सर्व फॉरमॅटमध्ये पाकिस्तानच्या कर्णधारपदाचा राजीनामा देत आहे. हा एक कठीण निर्णय आहे पण मला वाटते की हीच योग्य वेळ आहे.

बाबरने पुढे लिहिले की, 'मी एक खेळाडू म्हणून तिन्ही फॉरमॅटमध्ये पाकिस्तानकडून खेळत राहीन. माझा अनुभव आणि समर्पणाने मी नवीन कर्णधार आणि संघाला पाठिंबा देत राहीन. या उल्लेखनीय जबाबदारीसाठी मी पाकिस्तान क्रिकेट संघाचे मनापासून आभार मानू इच्छितो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karnataka Monsoon Update : राज्यात आजपासून मुसळधार पावसाचा इशारा; 11 जिल्ह्यांना यलो अलर्ट, चार जूनला मॉन्सून केरळात होणार दाखल

Cycling Story: ६० वर्षांपासून रोज सायकल चालवणारे पांडुरंग शिर्के; सहा वेळा सायकलवरून पंढरपूर वारी, आजही विनाऔषध तंदुरुस्त

Latest Marathi News Live Update : कुंभमेळ्यातील रिंग रोड बाधित शेतकऱ्यांच्या आंदोलनाला संजय राऊतांची भेट; समाधानकारक मोबदला देण्याची मागणी

Delhi Fire इमारतीत आग, बाहेरून कुलूप; २१ जण जिवंत होरपळले; उपचारासाठी आलेल्या परदेशी नागरिकांचाही मृत्यू

Mahayuti 17 MLC Candidates : विधानपरिषद निवडणुकीसाठी महायुतीच्या १७ उमेदवारांची यादी जाहीर; सर्व जागांवर विजयाचा दावा

SCROLL FOR NEXT