Babar Azam Pak vs Eng Final T20 World Cup sakal
क्रीडा

Babar Azam : पत्रकार परिषदेत IPL च्या गुगलीवर बाबर भांबावला; अखेर मीडिया मॅनेजर आला धावून

आयपीएलशी संबंधित प्रश्न आणि बाबरचं मीडिया मॅनेजरकडे तोंड, पुढे काय झाले ते पाहा रंजक व्हिडिओमध्ये

Kiran Mahanavar

Babar Azam Pak vs Eng Final T20 World Cup : ऑस्ट्रेलियात खेळल्या जात असलेल्या टी-20 विश्वचषक 2022 च्या अंतिम सामन्यात पाकिस्तान आणि इंग्लंडचे संघ 13 नोव्हेंबरला आमनेसामने येणार आहेत. दोन्ही संघ आपापले दुसरे विजेतेपद पटकावण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे. पाकिस्तानने 2009 मध्ये तर इंग्लंडने 2010 चा विश्वचषक जिंकला आहे. दरम्यान अंतिम सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत पत्रकाराने पाकिस्तानी कर्णधार बाबर आझमला आयपीएलवर प्रश्न विचारले. त्यावर बाबर आझमचे बोलती बंद झाली.

हेही वाचा : हिंदी चित्रपटांत का वाढते आहे हिंदुत्वाची कट्टरता?

पत्रकार परिषदेत बाबर आझम पत्रकारांना उत्तरे देत असतानाच एका पत्रकाराने आयपीएलशी संबंधित प्रश्न विचारला. रिपोर्टरने विचारले, आयपीएल तुम्हाला आणि तुमच्या टीमला मदत करेल असे तुम्हाला वाटते का? भविष्यात आयपीएल खेळण्याची आशा आहे का? या प्रश्नावर बाबर आझम काहीच उत्तर देऊ शकले नाहीत, तो आपल्या मीडिया मॅनेजरकडे पाहू लागला. यानंतर मीडिया मॅनेजर म्हणाले की, सध्या आपण विश्वचषक फायनलशी संबंधित प्रश्नांवरच बोले पाहिजेत असं सांगून प्रकरण हाताळलं.

आयपीएलच्या पहिल्या हंगामात पाकिस्तानच्या खेळाडू सहभाग झाले होते. आयपीएल 2008 मध्ये शोएब अख्तरपासून शाहिद आफ्रिदीपर्यंत अनेक पाकिस्तानी खेळाडू भारतीय मैदानावर दिसले. मात्र त्यानंतर त्याच वर्षी मुंबईत 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध ताणले गेले. तेव्हापासून भारत आणि पाकिस्तान यांच्यात कोणतीही द्विपक्षीय मालिका झालेली नाही किंवा पाकिस्तानी खेळाडू आयपीएलमध्ये खेळलेले नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : मनसे नेते अविनाश जाधव यांची सुटका, आंदोलनात घेतला सहभाग

MNS Mira bhayandar Morcha: मराठी मोर्चाला पोलिसांचा अडथळा? गुजराती-मारवाडींची चिथावणी; मीरा-भाईंदरमध्ये काय घडलं?

निशिकांत दुबेंच्या विधानावर शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले मंत्री प्रताप सरनाईक?

Viral Video : पुढील कसोटीसाठी येण्याची तसदी घेऊ नकोस! Dinesh Karthik ने सर्वांसमोर रवी शास्त्रींची केली पोलखोल

अखेर अस्मिताला समजणार प्रियाचा खरा चेहरा; भावजयीवर चांगलीच भडकली , वाचा 'ठरलं तर मग' मध्ये पुढे काय होणार?

SCROLL FOR NEXT