Babar Azam Shaheen Afridi
Babar Azam Shaheen Afridi esakal
क्रीडा

Babar Azam : कर्णधार होताच शाहीनने दाखवले रंग; बाबर आझमला दिला मोठा धक्का

अनिरुद्ध संकपाळ

Babar Azam Shaheen Afridi : न्यूझीलंडविरूद्धच्या टी 20 मालिकेसाठी पाकिस्तानी संघाची घोषणा झाली असून शाहीन आफ्रिदीच्या गळ्यात कर्णधार पदाची माळ पडली आहे. शाहीन आफ्रिदी कर्णधार झाल्यानंतरची ही पहिलीच मालिका आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यापूर्वीच शाहीनने माजी कर्णधार बाबर आझमला एक मोठा झटका दिला आहे.

बाबर आझम यापूर्वी टी 20 क्रिकेटमध्ये सलामीला येत होता. मोहम्मद रिझवान आणि बाबर आझम यांच्या सलामी जोडीने अनेक स्मरणीय खेळी केल्या आहेत. मात्र आता शाहीन आफ्रिदीने ही सलामी जोडी बदलली असून आता युवा फलंदाज सईम अयूब आणि मोहम्मद रिझवान डावाची सुरूवात करतील. तर बाबर आझम तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करू शकतो.

न्यूझीलंडविरूद्धच्या टी 20 मालिकेपूर्वी सराव करताना संघ व्यवस्थापनाने सईम आणि रिझवानला नवीन चेंडूवर सराव करण्यास सांगितले. तर फखर जमान आणि बाबर आझम हे फिरकी गोलंदाजांच्या नेटमध्ये सराव करताना दिसले. पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला टी 20 सामना हा 12 जानेवारीला होणार आहे.

टी 20 क्रिकेटमध्ये बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान या जोडीने मोठं यश मिळवलं आहे. मात्र नवा कर्णधार शाहीन आफ्रिदी, कामगिरी प्रशिक्षक यासिर अराफात आणि संघ संचालक मोहम्मद हाफीज यांना न्यूझीलंडविरूद्धच्या मालिकेत काहीतरी नवीन करायचं आहे.

दुबईत झालेल्या 2021 च्या टी 20 वर्ल्डकप दरम्यान बाबर - रिझवान जोडीने भारताविरूद्ध 150 धावांची नाबाद भागीदारी रचली होती. पाकिस्तानने वर्ल्डकप इतिहासात पहिल्यांदाच भारताचा पराभव केला होता.

बाबर आझम आता पाकिस्तानच्या कोणत्याही संघाचा कर्णधार नाहीये. भारतात झालेल्या वनडे वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानने सुमार कामगिरी केली होती. त्यानंतर बाबर आझमने संघाचे नेतृत्व सोडले. आता बाबर आझम टी 20 क्रिकेटमध्ये तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणार आहे.

शाहीन आणि हाफीज यांनी याबाबत चर्चा केली असून बाबर आझमच्या बॅटमधून येणारा धावांचा ओघ सध्या रोडावला आहे. आशिया कपमध्ये नेपाळविरूद्धची खेळी सोडली तर बाबर आझमची बॅट शांत होती. वनडे वर्ल्डकपमध्ये देखील बाबर आझमचा बॅडपॅच सुरूच होता. ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या कसोटी मालिकेत देखील बाबर आझमने सुमार कामगिरी केली.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT