Ball Hit On Pakistan batter Shan Masood Head on Friday esakal
क्रीडा

India Vs Pakistan : पाकिस्तानला धक्का! फलंदाज शान मसूदच्या डोक्यावर आदळला बॉल

अनिरुद्ध संकपाळ

Pakistan batter Shan Masood : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय व्होल्टेड सामना अवघ्या दोन दिवसांवर आला असताना पाकिस्तानला एक मोठा धक्का बसला. पाकिस्तानचा वरच्या फळीतील फलंदाज शान मसूदच्या डोक्याला दुखापत झाली आहे. सरावावेळी त्याच्या डोक्याला चेंडू लागल्याने त्याला त्वरित रूग्णालयात स्कॅन करण्याासाठी पाठवण्यात आले आहे. शान मसूदला ही दुखापत मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर सराव सत्रावेळी झाली.

पाकिस्तानचा संघ भारताविरूद्धच्या टी 20 सामन्यासाठी कसून सराव करत होता. या दरम्यान, पाकिस्तानचा फलंदाज मोहम्मद नवाझने फिरकीपटूला एक जोरदार फटका खेळला. हा चेंडू थेट शान मसूदच्या डोक्यावर लागला. शान मसूदने फलंदाजी करण्यासाठी पॅड्स घातले होते. मात्र हेलमेट घातले नव्हते. तो नेटमध्ये फलंदाजी करण्यासाठी आपला नंबर कधी लागतो याची वाट पाहत होता. ज्यावेळी चेंडू शान मसूदच्या डोक्यावर आदळला त्यावेळी तो वेदनेने कळवळत खाली कोसळला. त्यानंतर पाकिस्तान संघातील डॉक्टर त्वरित त्याच्याकडे धावले.

दरम्यान, पाकिस्तानचा उपकर्णधार शादाब खान म्हणाला की, 'शान मसूदच्या डोक्याच्या संवेदनशील भागावर चेंडू आदळला आहे. त्याची सध्याची परिस्थिती काय आहे हे मला माहिती नाही. मात्र आमच्या फिजिओने घेतलेल्या चाचणीत तो पास झाला आहे. आता त्याला स्कॅन करण्यासाठी रूग्णालयात नेण्यात आले आहे. आम्ही तो लवकरात लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना करत आहोत.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ज्येष्ठ नागरिक आक्रमक! 'डीजेमुक्त सोलापूरसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा'; डीजेग्रस्तांचा आवाज जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्तांच्या कानावर

Vice President Election 2025 : बहुमत नाही म्हणून एनडीएची विरोधी पक्षांना मतदानाची विनंती; उद्धव ठाकरेंच्या खासदाराचा दावा

Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मिरची होती का? जेवणात काय झणझणीत वापरत होते?

Bail Pola Festival 2025: आज आवतण घ्या, उद्या जेवायला या; खांदेमळणीने सुरू होणार कृषी संस्कृतीचा उत्सव बैलपोळा

Panchganga River : पंचगंगा नदी धोका पातळीपासून ३ इंच दूर; बावडा-शिये मार्ग बंद, नदीकाठी सतर्कतेचा इशारा, 'या' मार्गांवर वाहतूक बंद

SCROLL FOR NEXT