Ball Of The Century
Ball Of The Century sakal
क्रीडा

Ball Of The Century : भज्जीचा रनअप, मुरलीची ॲक्शन अन् वॉर्नचा टर्न... कुवेतच्या खेळाडूने टाकला 'बॉल ऑफ सेंच्युरी'!

Kiran Mahanavar

Kuwait Bowler Bowls Ball Of The Century : क्रिकेट जगतात महान फिरकी गोलंदाज शेन वॉर्नला फिरकीचा जादूगार म्हणून ओळखला जात होता. त्याचा एक चेंडू आजही प्रसिद्ध आहे, ज्याला मॅजिक बॉल किंवा बॉल ऑफ सेंचुरी असेही म्हणतात.

आता यादरम्यान असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये कुवेत देशाचा एक गोलंदाज अनोखा चेंडू टाकत आहे. हा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर पडतो आणि नंतर थेट लेगस्टंप उडवतो.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कोणी त्याला बॉल ऑफ सेंचुरी म्हणत आहेत तर कोणी त्याला मॅजिक बॉल म्हणत आहेत. एवढेच नाही तर या खेळाडूच्या गोलंदाजीच्या शैलीतही तीन महान खेळाडूंची प्रतिमा दिसते. काहींना त्याचा रनअप हरभजन सिंग सारखा दिसतो. त्यानंतर बॉल सोडतानाची तो मुथय्या मुरलीधरनसारखा वाटतो. याशिवाय त्याने ज्या पद्धतीने चेंडू फिरवला त्यामुळे शेन वॉर्नची आठवण झाली.

हा व्हिडिओ कुवेतमधील एका गावातील क्रिकेट स्पर्धेचा आहे. हा कोणताही आंतरराष्ट्रीय सामना नव्हता. पण या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये बरेच लोक म्हणतात की, तो नो बॉल आहे कारण त्याचा पाया रेषेच्या पुढे गेला आहे. यादरम्यान, असे टन पाहून अनेकांना आश्चर्य वाटले. या कारणास्तव, कमेंट बॉक्समध्ये अनेकांनी त्याला बॉल ऑफ द सेंच्युरी म्हटले आहे. काही लोकांनी एकच कमेंट केली की हे हरभजन सिंग आणि मुथय्या मुरलीधर यांचे मिश्रण दिसत आहे. आणि टन पाहिल्यावर शेन वॉर्नची आठवण झाली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Accident News: लग्नाच्या वऱ्हाड्यांना घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरचा भीषण अपघात; १३ जणांचा जागीच मृत्यू, अनेक जण जखमी

Ruben Trumpelmann : बुमराह-शमीला जे जमले नाही ते नामिबियाच्या पठ्ठ्याने केलं! टी-20 वर्ल्ड कपमध्ये रचला इतिहास

Toll Rate Hike: मतदान संपले.. आजपासून वाढले देशातील टोल, प्रवाशांच्या खिशाला कात्री

Mumbai Local Train : मुंबईत पश्चिम रेल्वेची सेवा विस्कळीत; चर्चगेटच्या दिशेने धावणाऱ्या गाड्या उशिराने

SL vs SA T20 WC 24 : श्रीलंकेसमोर दक्षिण आफ्रिकेला रोखण्याचे आव्हान! मार्करम-हसरंगा आमने-सामने

SCROLL FOR NEXT