Shardul Thakur esakal
क्रीडा

Shardul Thakur : संघ अडचणीत... चेंडू थेट डोक्यावर लागला तरी मैदान न सोडता शार्दुल लढला!

अनिरुद्ध संकपाळ

Shardul Thakur Helmet India Vs South Africa 1st Test : भारताचा अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूरने दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात आपला झुंंजारपणा पुन्हा एकदा दाखवून दिला. कॉट्झीचा एक बाऊन्सर शार्दुल ठाकूरच्या हेलमेटवर आदळला होता. त्यामुळे त्याच्या कपाळाला दुखापत देखील झाली मात्र या मराठमोळ्या पठ्ठ्याने मैदान सोडलं नाही. त्याने झुंज देण्याचं ठरवलं अन् भारताला सन्मानजनक स्थितीत पोहचवलं

दक्षिण आफ्रिकेतील खेळपट्ट्यांवर चेंडू कधीही उसळी घेऊ शकतो. याचा प्रत्यय शार्दुल ठाकूरला आजच्या सामन्यात आला. भारतीय संघ 121 धावांवर पोहचला असताना रबाडाने रविचंद्रन अश्विनला बाद केले. यानंतर शार्दुल ठाकूर क्रीजवर आला. त्याने आफ्रिकेच्या तोफखान्याला चांगलं तोंड दिलं.

शार्दुल ठाकूरने केएल राहुल सोबत सातव्या विकेटसाठी भागीदारी रचण्यात सुरूवात केली. शार्दुल आणि केएलची जोडी जमली असे वाटत असतानाच कॉडझीने शार्दुलला एक बाऊन्सर टाकला. त्यावर शार्दुलनेही पूल शॉट खेळला. मात्र चेंडू थेट शार्दुलच्या हेलमेटवर आदळला.

शार्दुलच्या हेलमेटवर चेंडू जोरात आदळल्यामुळे त्याच्या कपाळवार थोडी दुखापत झाली होती. मात्र शार्दुलने मैदान न सोडता थोडावेळ उपचार घेत पुन्हा फलंदाजीला सुरूवात केली. त्याने केएल साबत 43 धावांची भागीदारी रचत संघाला 160 चा आकडा पार करून दिला.

मात्र रबाडाने शार्दुलला 24 धावांवर बाद करत ही जोडी फोडली. शार्दुल बाद झाल्यानंतर केएल राहुलने जसप्रीत बुमराह सोबत चहापानापर्यंत भारताला 174 धावांपर्यंत पोहचवलं.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ: Virat Kohli त्याचे सामनावीर ट्रॉफी कुठे ठेवतो? न्यूझीलंडविरुद्ध पुरस्कार जिंकल्यानंतर सांगून टाकलं

WPL 2026, DC vs GG: १ बॉल अन् ५ धावा... गुजरात जायंट्सने मिळवला थरारक विजय, जेमिमाच्या दिल्लीचा सलग दुसरा पराभव

२०१४पासून अदानीकरण! हे बघून भीती वाटली नाही तर निवडणूक न लढलेली बरी; राज ठाकरेंनी दाखवले VIDEO

Bigg Boss Marathi 6: ९० दिवस, १७ स्पर्धक; पाहा 'बिग बॉस मराठी ६' च्या घरातील स्पर्धकांची यादी

अजित पवारांना लाथ मारून हाकला किंवा माफी मागा, गाडीभर पुरावे कोर्टात द्या; भ्रष्टाचारावरून ठाकरे बंधूंनी फडणवीसांना घेरलं

SCROLL FOR NEXT