Tamim Iqbal Retires sakal
क्रीडा

Tamim Iqbal Retires : वर्ल्ड कपपूर्वी बांगलादेश क्रिकेटमध्ये मोठा भूकंप! कर्णधाराला 'रडत' घ्यावी लागली निवृत्ती

Kiran Mahanavar

Tamim Iqbal Retires : एकदिवसीय विश्वचषक 2023 ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतात खेळल्या जाणार आहे. विश्वचषकाच्या तीन महिन्यांपूर्वी बांगलादेश क्रिकेटमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. बांगलादेश संघाचा कर्णधार तमिम इक्बालने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.

यासह 34 वर्षीय तमिम इक्बालची 16 वर्षांची आंतरराष्ट्रीय कारकीर्द संपुष्टात आली. बांगलादेश क्रिकेट मध्ये सध्या शाकिब अल हसन टी-20 फॉरमॅटमध्ये आणि लिटन दास टेस्ट फॉरमॅटमध्ये कर्णधार आहे.

बांगलादेशला अफगाणिस्तान विरुद्ध चितगाव येथे झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात 17 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता, त्यानंतर तमिमने हे पाऊल उचलले आहे. तमिमने गुरुवारी चितगाव येथे पत्रकार परिषदेत याची घोषणा केली. यावेळी तमीम खूप भावूक झाला होता आणि तेव्हा त्याचे अश्रू अनावर झाले.

तमिम इक्बालने गेल्या वर्षी याच सुमारास टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्याची शेवटची कसोटी यावर्षी एप्रिलमध्ये आयर्लंडविरुद्ध होती, तर शेवटचा एकदिवसीय सामना अफगाणिस्तानविरुद्ध होता. तमिमने फेब्रुवारी 2007 मध्ये झिम्बाब्वेविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यातून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. त्याच वर्षी त्याने एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारतावर बांगलादेशच्या विजयात सामना जिंकणारे अर्धशतक झळकावले.

तमिमने 70 कसोटी सामन्यांमध्ये 38.89 च्या सरासरीने 5134 धावा केल्या ज्यात 10 शतके आणि 31 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याचबरोबर तमिमच्या वनडेत 36.62 च्या सरासरीने 8313 धावा आहेत. तमिमने एकदिवसीय सामन्यांमध्ये 14 शतके आणि 56 अर्धशतके केली आहेत. तमिमने 78 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 24.08 च्या सरासरीने 1758 धावा केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये तमिमच्या नावावर एक शतक आणि सात अर्धशतके आहेत.

तमिम हा एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये आपल्या देशासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. बांगलादेशचा एकदिवसीय कर्णधार म्हणून तमीमची विजयाची टक्केवारी मशरफी मोर्तझापेक्षा थोडी जास्त आहे. तमिमने त्याच्या नेतृत्वाखाली बांगलादेशला 37 पैकी 21 सामने जिंकले. तमिमने 2017 मध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात बांगलादेशचे नेतृत्वही केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पवन हंस हेलिकॉप्टर ७ जणांसह समुद्रात कोसळलं, हेलिपॅड फक्त ३०० मीटरवर होतं; काय घडलं?

British Airways Boeing 787 Emergency Landing in Nagpur : लंडनहून निघालेलं विमान अचानक नागपुरात! 169 प्रवाशांचा जीव टांगणीला; पहाटे 5:30 वाजता नेमकं काय घडलं?

Share Market fraud: जादा नफ्याच्या आमिषाने घातला ४३ लाखांना गंडा; शिरवळ पोलिस ठाण्यात गुन्हा; आयपीओमधून ऑनलाइन फसवणूक!

२ महिन्यांपूर्वी संपली मालिका! पुन्हा येतेय गिरीजा आणि मंदारची जोडी; अभिनेत्याने स्वतः दिली गुड न्यूज

Latest Marathi News Live Update : राजूर ते अहिल्यानगर १४८ किमी पायी लाँगमार्चला सुरुवात; मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ‘लाल वादळ’ मार्गस्थ

SCROLL FOR NEXT